Tag: ऑस्ट्रिया
शेवगाव पक्षी निरीक्षणातील कॅमेऱ्यात मगरीचे शेपूट
पैठणचे जायकवाडी धरण शेवगावपासून (नगर जिल्हा) अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथे हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी येत असतात. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आवश्यक ती भौगोलिक परिस्थिती शेवगावापासून हाकेच्या अंतरावर तयार झाली आहे. तिचा लाभ सभोवतालच्या खेड्या-शहरांतील लोक आनंदाने घेत असतात. खरे तर, नाथसागर जलाशयाचा सर्व भाग हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे...
लंडन खूप दूर आहे… (Corona Experience in Britain)
कोरोनासंबंधात लंडन येथे राहत असलेल्या वेल्हाणकर व दळवी कुटुंबीयांशी संपर्क साधला. अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर या पतिपत्नींनी तेथील माहिती दिली. पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 29 जानेवारी 2020 रोजी आढळला. बरेच लोक डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत इटाली, ऑस्ट्रिया अशा युरोपीयन देशांत सहलीसाठी जातात.