सैनिकी परंपरा घाटावर अनेक गावांत दिसते, तशी ती कोकणात नाही. रायगड येथील सैनिकी शाळा वगळता अन्य ठिकाणी तशी शाळा नाही. तरी देवरुख येथे 2018 साली शहीद स्मारक तयार करण्यात आले. ते कोकणाच्या पाच जिल्ह्यांतील एकमेव स्मारक आहे आणि ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहीद स्मारकच्या जोडीला तयार करण्यात आलेले परमवीर चक्र दालन आणि सैनिक मानवंदना उद्यान तर कोकणाची ओळख होऊ पाहत आहे !...