Tag: एकनाथ आव्हाड
एकनाथ आव्हाड – दापूर ते दिल्ली…
एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ घोषित झाला. त्यांचा समावेश आघाडीच्या बाल साहित्यकारांमध्ये होतोच. पुरस्काराने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी त्यांचा जीवनप्रवास नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दापूर या छोट्या खेड्यातून सुरू केला. नरेंद्र पाठक यांनी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांच्याशी गप्पा मारण्याचे ठरवले. कायम शाळेत, पुस्तकात आणि मुलांमध्ये रमणारा हा सरस्वतीपुत्र; त्यांनी त्यांच्या बालपणापासूनची कथा सांगितली आहे...
खळाळता अवखळ झरा आणि इतर कथाः एकनाथ आव्हाड
एकनाथ आव्हाड यांचे ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’ हे मार्च 2022 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे मुलांसाठी लिहिलेल्या सोळा कथांचा संग्रह आहे. या कथा ओघवत्या शैलीत, दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि घटना यांतून फुललेल्या आहेत. शिक्षक-पालक-बालक असे सगळेजण कधी बरोबर, कधी चुकीचे वागतात असे ते सहज सांगतात. काय योग्य- काय अयोग्य हे कथनाच्या ओघात कळून जाते. मात्र त्या कथा उपदेशाचे डोस पाजत नाहीत. त्या सगळ्यांशीच हितगुज करतात. म्हणून त्या शिक्षक-पालक-बालक, तिघांनाही जवळच्या आहेत...