Tag: उपनिषदे
आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...
तत्त्वज्ञानातील सरस्वती शुभदा जोशी (Shubhada Joshi – Professor do Philosophy)
शुभदा जोशी यांचे नाव एकविसाव्या शतकातील बुद्धिमान विदुषी महिलांमध्ये प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांनी ‘लोकायत-चिकित्सक’ अभ्यास या विषयात पीएच डी मिळवली. त्यांचे पन्नास शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तत्त्वज्ञानाचा अर्क प्यायलेल्या शुभदा गेली चाळीस वर्षे अध्ययन-अध्यापनात अखंड कार्यरत होत्या! परदेशातही भारतीय तत्त्वज्ञानाचे बीज पेरणाऱ्या शुभदा जोशी यांची कारकीर्द संस्मरणीय आहे…
यम-नचिकेत संवाद
उपनिषदे म्हणजे उप+नि+सद्. त्याचा अर्थ – जवळ जाणे, बसणे, रहस्य उलगडणे. उपनिषदे ही वेदांचे अंग ‘वेदान्त’ म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रथम वेद, नंतर ब्राह्मणे, आरण्यके...