Tag: उत्तर प्रदेश
भीतीचे/धास्तीचे ग्रहण सुटत आहे !
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हा पृथ्वी-चंद्र-सूर्य यांच्या अवकाशातील स्थानांमुळे होणारा वैश्विक खेळ आहे. निसर्गनिर्मित असलेला हा खेळ मनुष्यवस्ती पृथ्वीवर येण्याआधीपासून अव्याहत सुरू आहे. सूर्यग्रहणाने ‘दृष्टी’ वैज्ञानिक केली आणि समाजातही वैज्ञानिक जाणिवा मंदगतीने का होईना पण जागृत होत जातील असा विश्वास वाटतो...
भारताच्या अर्थव्यवस्थेला इथेनॉल निर्मितीमुळे आधार
ऊस लागवडीचे देशातील वीस टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. ऊसाची मळी आंबवून त्यातील साखरेचे मद्यार्कात रूपांतर करतात. त्यांपासून अल्कोहोल, डिनेचर्ड स्पिरिट, इथेनॉल यांची निर्मिती होते. इथेनॉल पेट्रोल-डिझेलसारख्या इंधना बरोबर वाहनांसाठी वापरता येते...
गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)
भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत व नामवंत साहित्यिक कृ.पां. कुलकर्णी हे ओंड या गावचे सुपुत्र. या गावाची पदवीधरांचे गाव म्हणून ओळख आहे...
अचलपूर येथील गाढवपोळा
पोळा हा सण बैलांचाच, परंतु अचलपूर येथे भोई समाजात गाढवांचा पोळा आयोजित केला जातो. गाढवांप्रती कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे गाढव पोळा होय. ही प्रथा मागील पन्नास-साठ वर्षांपासून परतवाडा शहरातील दयाल घाट येथे जपली जात आहे...