रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील देगाव गावात 1941 रोजी बांधलेली एक आगळी वास्तू आहे. तीन बाजूंना पऱ्ह्याचे जणू नैसर्गिक कुंपण आणि समोरच्या बाजूला लालचुटुक मातीचा रस्ता… ते गावाच्या मधोमध वसलेले कौलारू घर आहे इंदिराबाई विद्याधर गोंधळेकर यांचे. सध्या तेथे त्यांचा मुलगा अशोक गोंधळेकर एकटे राहतात. ते व्यवसायाने इंजिनीयर आहेत. ते त्यांच्या मुंबईतील व्यवसायातून निवृत्त झाल्यावर वास्तू व बाग सांभाळण्यास गावी परतले...