महाराष्ट्रा तल्या आद्य मानवी वसाहतींची संस्कृवती 'जोर्वे-नेवासे' संस्कृेती म्हणून ओळखली जाते. ही दोन्ही गावे प्रवरा नदीच्या काठी आहेत. नेवाशाला जिथे उत्खनन झाले आहे ती जागा परतीच्या प्रवासात पाहावी असा विचार करून नकाशावर आधी जोर्वे गावाचा रस्ता शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात जोर्वेच्या आधी दायमाबाद अशी पाटी दिसली. दायमाबाद हा देखील त्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा पाडाव. मग आणखी पुढचे काहीच दिसेना. गाडी सरळ दायमाबादच्या दिशेने वळवली. दायमाबाद संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर...