वैद्य यशवंत काशिनाथ परांजपे हे योगी संन्यासी व जीवन्मुक्त असे संतमहात्मा होते. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी ‘संजीवन चिकित्सा’ ही भारतीय वैद्यक पद्धत शोधून काढली. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी समाधी घेतली! ती समाधी त्यांच्या मावळंगे येथील घराच्या आवारात पाहण्यास मिळते...
एका नटसम्राटाला भेटण्याचा योग आला. खराखुरा जिवंत, हाडामांसाचा, नाटकातले पात्र नसलेला नटसम्राट! तमाशाचा राजा! शब्बीरभाई मणियार. शब्बीर यांचा जन्म सिन्नर तालुक्याच्या शहा गावात गरीब कुटुंबात झाला. शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झाले. घरची परिस्थिती बेताची.
‘आठवणींचे पक्षी’ हे प्र.ई. सोनकांबळे यांचे आत्मकथन आहे. लेखक दलित समाजात जन्माला आल्यामुळे जे दुःख, दारिद्र्य व अपमान त्याच्या वाट्याला आला त्याचे चित्रण त्या आत्मकथनात आले आहे. लेखकाच्या बालपणापासून त्याचा प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास पुस्तकात येतो...
द. रा. कापरेकर हे श्रीनिवास रामानुजन् यांच्यानंतरचे जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ. ते मराठी आहेत याचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1905 ला...
‘प्रति सरकार’वा ‘पत्री सरकार’ हे नाव ज्या व्यक्तीबरोबर जोडले जाते ते क्रांतिसिंह नाना पाटील. ते 3 ऑगस्ट 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील ‘येडे मच्छिंद्र’ (बहेबोरगाव)...