Tag: अर्थ
अर्थांनो ! मागुते या !
शब्द आणि अर्थ ही जोडी तशी अतूट. पण कधी कधी दोघेही एकमेकांना हुलकावणी देत राहतात. मग कधीतरी कवीला शब्दांना साद घालावी लागते. म्हणून केशवसुत यांनी शब्दांना मागुते म्हणजे मागोमाग येण्याचे आवाहन केले. त्यांनी मनातल्या संवेदनांना आकार द्यावा, म्हणून शब्दांची विनवणी केली. तर विंदा करंदीकरांना मनातले अर्थ चिमटीत पकडायला, त्यांना आकार द्यायला शब्द अपुरे पडताहेत, असे जाणवले आणि ते लिहून गेले...