एका छोट्याशा, चार हजार लोकवस्तीच्या गावात दोनशेहून अधिक अपंग आहेत हे वाचून नवल वाटेल ! पण तसे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहे. त्याचे नाव आहे पाजपंढरी. त्या गावात अपंगांची संख्या एवढी का? तर गरोदरपणातील स्त्रियांच्या प्रकृतीची हेळसांड ! अनिल रामचंद्र रघुवीर या अपंग कार्यकर्त्याने त्याच्या प्रयत्नाने गावाच्या या व्यथेवर मात केली. त्याने हताश अपंग दुर्बलांना संघटित करून त्यांचे गाऱ्हाणे सरकार दरबारी मांडले. त्यांना ही प्रेरणा संतोष शिर्के नावाच्या दापोलीच्या सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळाली...