Tag: अनुताई वाघ
ताराबेन मश्रुवाला – माधानच्या दीपशिखा (Taraben Mashruwala changed the face of Madhan village)
ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले...
शिक्षण पत्रिका नव्वदी पार !
शिक्षण पत्रिका’ हे मासिक गेली नव्वद वर्षे अविरतपणे सुरू आहे. या मासिकाचे स्थान बालशिक्षणक्षेत्रात फार मोलाचे आहे. ताराबाई मोडक यांनी ‘मराठी शिक्षण पत्रिके’ची सुरुवात अमरावती येथे 1932 साली केली. मासिक 1933 पासून प्रकाशित होऊ लागले. त्यापूर्वी ‘शिक्षण पत्रिका’ गुजराती भाषेत प्रसिद्ध होत असे. पुढे ती हिंदी भाषेतही प्रसिद्ध होऊ लागली. ताराबाईंनी ‘शिक्षण पत्रिके’चे संपादन 1933 ते 1955 असे दीर्घकाळ केले. ‘शिक्षण पत्रिके’ने महाराष्ट्राला व भारतातील अनेक शहरांना बालशिक्षण या नव्या संकल्पनेची ओळख करून दिली...
बालशिक्षणातील अनुताईंचे प्रयोग ! (Anutai Wagh : Pioneering Efforts in Child Education)
अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या सहकारी. त्यांनी कोसबाडच्या आदिवासी भागातील बालशिक्षणाचे- ताराबाई मोडक यांचे कार्य जोमाने पुढे नेले. त्या कार्याला अनेक पदर जोडले. अनुताई यांचे वैयक्तिक आयुष्य दु:खद होते. त्यांना मातृत्व तर सोडाच; पण विवाहितेचे सौभाग्यही क्षणिक लाभले ! मात्र अनुताईंनी आदिवासींच्या व दलितांच्या मुलांना वात्सल्याने स्वत:च्या कवेत घेतले. त्या समाजातील मुलांचे खरे शिक्षण ‘त्यांना माणसात आणण्याचे’ होते. ती मुले केवळ शिक्षणापासून वंचित नव्हती, तर त्यांचे शिक्षणाशी जणू शत्रुत्व तयार झाले होते. त्यांनी तशा मुलांच्या गळी शिक्षण उतरवण्याचा लोकविलक्षण खटाटोप केला...
बालशिक्षणाच्या प्रणेत्या : ताराबाई मोडक ! (Tarabai Modak : Pioneer of Child Education)
ताराबाई मोडक पद्मभूषण; त्यांच्या शिष्य अनुताई वाघ पद्मश्री- एकाच कार्यात गुंतलेल्या गुरुशिष्य जोडीला पद्म सन्मान मिळाल्याचे उदाहरण विरळा. त्या गुरूशिष्यांनी कोसबाड येथे बालशिक्षणविषयक अनेक प्रयोग 1956 सालापासून केले. त्यांनी त्यांच्या प्रयोगांमध्ये मॉण्टेसरी पद्धतीची शिक्षणविषयक मूलतत्त्वे घेऊन, त्यांच्या कार्यपद्धतीत फेरफार केले. शिक्षकांना व ग्रामीण कारागिरांना तयार करता येतील अशी शैक्षणिक साधने रचली. ‘कुरण शाळा’, ‘उद्योग शाळा’, ‘निसर्ग भ्रमण’, ‘लेखन-वाचन वर्ग’ असे उपक्रम योजले. त्यांनी तर ‘अंगणवाडी’ व ‘बालवाडी’ या संकल्पना समाजात रुजवल्या ! ताराबाईंनी सुरू केलेल्या ‘शिक्षण पत्रिका’ मासिकाला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत...