गोंधळीसमाजाचे बांधव गोंधळी नाटक दीडशे वर्षांपासून वागदरी येथे करत आले आहेत. वागदरी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील, सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. तेथे मराठी व कन्नड, दोन्ही भाषांचा वावर आहे. सर्व सण-उत्सवातील सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांत द्विभाषा सूत्र फार जाणवते.