‘वावटळ’ हा प्राध्यापक द.के. गंधारे यांचा पहिला काव्यसंग्रह कवितेच्या दालनात आत्मविश्वासाने प्रवेश करतो. ‘वावटळ’मधील कविता ग्रामीण वास्तवाला साक्षात करते. काटेवनाची मोठी अरण्ये जागतिकीकरणानंतर झाली आहेत. त्यांतील अडचणींच्या वावटळींनी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तीच वावटळ गंधारे यांच्या कवितेतून साकार झाली आहे. कवी बालपणापासून ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवांनी त्याच्या कवितांत प्रातिनिधिक रूप धारण केले आहे...
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत...
नगर जिल्ह्याच्या पश्चिम घाटातील सांदण दरी हा एक आगळावेगळा भू-आकार आहे. ती त्या प्रकारची भारतातील एकमेव तर आशिया खंडातील क्रमांक दोनची दरी समजली जाते....
शिक्षक म्हणून शिक्षणाच्या वाटेवरून प्रवास करताना एक ‘समज’ हळुहळू आतल्या आत विकसित होत गेली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या चांगल्या शाळांतही शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहून...
चोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्ट दिवस... सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी...