Tag: स्मिता स्मितं आणि मी
प्रतीकचा सांभाळ हीच स्मिताची ओढ !
‘इन्साफ का तराजू’ने थोडेफार नाव कमावलेल्या राज बब्बरने ‘आज की आवाज’मध्ये त्याची नायिका झालेल्या स्मिताला जाळ्यात अडकावले. स्मितानेदेखील त्या काळात कोणाचे मत जुमानले नाही, ती होतीच तशी बंडखोर ! लग्न झालेला संसारी पुरुष तिने निवडला. ती दोघे ‘लिव्ह इन’मध्ये 1980 च्या दशकात राहत होते यावरून त्यांच्या बेफिकीर आणि धाडसी वृत्तीची प्रचीती यावी...
स्मिता पाटील – मूड आणि स्विंग्स !
स्मिता पाटील हिला केवळ एकतीस वर्षांचे आयुष्य लाभले होते; त्यात तिची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जेमतेम अकरा वर्षांची. परंतु त्या काळात तिने निर्माण केलेले अभिनयविश्व व त्यापलीकडे जाऊन तयार केलेले माणसांचे भावबंध विलक्षण आहेत. तिचे व्यक्तिमत्त्व तिच्या भावविश्वात आलेल्या व्यक्तींच्या अंतरंगात मिसळून जात असे, त्या व्यक्तीच्याही नकळत...