Home Tags सुखदेव काळे

Tag: सुखदेव काळे

दापोलीतील साहित्यजीवन

‘श्यामची आई’, ‘गारंबीचा बापू’ या साहित्यकृतींमुळे दापोलीचा ठसा साहित्य क्षेत्रात उमटला. दापोली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. तेथील तरुण वर्ग मुंबई-पुण्याकडे ‘करिअर’साठी जात आहे. असे असतानाही दापोलीचा निसर्ग, तेथील जीवन बाहेरगावी गेलेल्या तरुणांच्या मनातून जात नाही. ती ते त्यांच्या साहित्यातून प्रकट करतात. खुद्द दापोलीत राहणारे साहित्यिकही त्यांच्या परीने त्या करता धडपडत असतात. त्यांचा आढावा...

नास्तिकांची दापोली

कोकणी माणूस त्याचे कुळाचार, त्या त्या समाजाने ठरवलेल्या रूढी-प्रथा-परंपरा कटाक्षाने पाळणारा आहे. कोकणवासी मंडळी धार्मिक सण-उत्सव यांत वर्षभर मग्न व दंग असतात. तरीही दापोली तालुक्यातील नास्तिक नमुने त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात याचा मला अचंबा वाटत आला आहे. दापोलीतील निरीश्वरवादी मंडळींवर उपजत चिकित्सक वृत्ती, वाचन, नास्तिक मंडळींचा सहवास आणि समाजवादी धोरण या घटकांचा प्रभाव दिसून येतो...
gazalkar1

दिलीप पांढरपट्टे – समृद्ध जाणिवांचा गझलकार

1
मराठी गझल समृद्ध करण्यातील दिलीप पांढरपट्टे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मराठी गझलमध्ये जे दहा-बारा महत्त्वाचे गझलकार मानले जातात त्यात पांढरपट्टे अग्रेसर आहेत. सुरेश भटांच्या कवितेच्या कार्यक्रमाचा परिणाम अनेक तरुणांवर झाला, त्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे हे कवी होते. पांढरपट्टे ते ऋण कृतज्ञतेने मान्य करतात...