Home Tags श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

Tag: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

गंधर्वतुल्य गायन करणारे नट – भाऊराव कोल्हटकर

मराठी रंगभूमीवरील गायक नट म्हणून भाऊराव कोल्हटकर हे त्यांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या त्यांनी साकारलेल्या स्त्रीभूमिकांमुळे विशेष गाजले. परंतु पुढे, त्यांनी ‘सुभद्रे’चा अपवाद वगळता 1889 सालानंतर मुख्यत्वे पुरुष भूमिका साकारल्या त्या अखेरपर्यंत. भाऊराव त्यांचा मधुर गळा, त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा उत्तम अभिनय यांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचले…

निबंधमालेतील भविष्यवेध !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ सुरू केली ती बहुश्रुतता व योग्य पुस्तकांची लोकांना माहिती देऊन मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने. त्यांनी ‘निबंधमाले’तून सकस, वैचारिक आणि दर्जेदार लेखांचे सलग आठ वर्षे लेखन करून 1881 पर्यंत विविध छापखान्यांतून चौऱ्याऐंशी अंक छापून प्रसिद्ध केले. विष्णुशास्त्री यांनी ‘निबंधमाले’तून मनोरंजन न करता लोकजागृती, विचारक्रांती आणि मराठी भाषेची अभिव्यक्ती याची कास धरली...

कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)

"ज्या वेळी संग्रहाचं, जतनाचं हे काम तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटेल तेव्हा मला कळवा." लंडन युनिव्हर्सिटीचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी मला आश्वासक सुरात पाठिंबा दिला...

तेरावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1927)

तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. ते मराठीतील विनोदी वाङ्मयाचे आद्यप्रवर्तक होत. ‘सुदाम्याचे पोहे’हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह म्हणजे मराठी वाङ्मयाचे भूषण मानले जाते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता.