Tag: राजापूर तालुका
आंबोळगड – प्रतिगोवा !
आंबोळगड हे आमचे गाव कोकणाच्या राजापूर तालुक्यात रत्नागिरीपासून पन्नास किलोमीटर आणि राजापूरपासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. ते तीन बाजूंनी समुद्राच्या कुशीत वसले आहे. एकीकडे डोंगरकड्याशी कठोर झुंजणाऱ्या सागरलाटा आणि दुसरीकडे वाळूशी पदन्यास करणाऱ्या सागरलाटा… दोन्ही विभ्रम एकाच ठिकाणाहून दिसतात. निसर्गराजाची अशी नानाविध रूपे तासन् तास न्याहाळत बसावे, असे आहे हे आंबोळगड गाव. गावाचे क्षेत्रफळ दोनशे एकर आहे. गावात शिवकालीन इतिहासाची शौर्य परंपरा, गौरवशाली संस्कृती यांची यशोगाथा सांगणारा पुरातन किल्ला आहे. किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर व तोफा आहेत. तटबंदी छोटी असली तरी मजबूत आहे. त्या किल्ल्यामुळेच गावाला आंबोळगड असे नाव पडले...
वेत्त्ये- निसर्गसंपन्न आडगाव! (Vettye)
वेत्त्ये हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील सागरकिनारी वसलेले छोटेसे गाव. आडिवरे गावाचे उपनगर म्हणावे असे. त्या गावाला श्रीदेवी महाकालीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आडिवरे...
असेल माझा हरी!
सुनील नारकर हे अमेरिकेत उद्योजक म्हणून सुस्थापित आहेत. त्यांनी तेथील टीव्हीवर मॉडेल, अँकर म्हणून लौकिक मिळवला आहे. त्यांनी चित्रपट अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही लक्षवेधी चित्रपटांची...
ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते
'ऑर्गन' हे पाश्चात्य संगीतामध्ये सर्वात गुंतागुंतीचे आणि महत्वाचे एक वाद्य. दिसायला सर्वसाधारण आपल्या पायपेटीसारखेच, पण तंत्रज्ञान आणि बांधणी वेगळी असल्याने अधिक नादमाधुर्य निर्माण करणारे....