Home Tags नैवेद्य

Tag: नैवेद्य

कोजागिरी पौर्णिमा अर्थात मोत्यांची पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा मी इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर साजरी केली आहे की बस ! कधी शेतात, कधी गच्चीवर, कधी नदीकाठी; तर कधी कोणाच्या अंगणात. त्या प्रत्येक पौर्णिमेची आठवण माझ्यासाठी खास आहे. आमच्या घरी त्या दिवशी पहिल्या अपत्याला, म्हणजे मला ओवाळायचे, नवे कपडे घ्यायचे. काहीतरी गोडधोडाचे जेवण करायचे...

सातपुड्यातील लोकउत्सव – बहिरम यात्रा

बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी व मराठी भाषिक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे ! यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवर भरते. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेचा लौकिक सर्वदूर आहे. यात्रेला पौराणिक महात्म्य आहे. बहिरम (भैरवनाथ) हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनासोबत अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्य संस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशी सर्व गोष्टींची रेलचेल राहते...

पळण (Running away from Village)

मी आईला विचारले, “आय, का आलो आपण इथं?” आईने थोडक्यात उत्तर दिले, “याला पळण म्हणतात.” मी प्रश्न विचारला, “पळण म्हणजे काय?” माझी आई मला माझ्या नावावरून लहानपणी देवके म्हणत असे. ती मला म्हणाली, “अगं देवके, आज आपल्या गावात हिंदू लोकं नवरात्रीच्या टायमाला देवीला बळी देतात. म्हणून आपण इथं आलो.”...

धयकाल्याच्या रात्री…

0
कोकणातील श्रीकृष्ण अष्टमीच्या दहीकाल्यात गाजते ती गणेशाची पूजा. रंगमंचावर गणपतीची पूजा करताना भटजींकडून होणारे विनोद आणि गणपतीची होणारी आरती हे सारेच मालवणी लोकसंस्कृतीचे आगळेवेगळे संचित आहे. गणेशाची पूजा केली जात असताना, आरती म्हणताना होणारा संवाद ऐकण्यास खूपच गोड असतो. मालवणी शिवी ही ओवीप्रमाणे असते याची प्रचीती तेथे येते...

मसुरेची भराडीदेवी यात्रा (Masure’s Bharadidevi Festival)

0
मसुरे गावाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंगणेवाडी येथील भराडीदेवीचे मंदिर आणि तेथे फेब्रुवारी-मार्च दरम्यान भरणारी दरवर्षीची देवीची जत्रा. भराडीदेवीविषयी कथा अनेक प्रचलित आहेत. त्यांपैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. स्वतः चिमाजीअप्पांना एका मोहिमेदरम्यान भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभला होता. म्हणून त्यांनी बावीस हजार एकर जमीन देवळासाठी दान केली...