Home Tags निंबळक

Tag: निंबळक

रुक्ष, ओसाड बरड : पालखीचा तेवढा विसावा ! (Barren Barad)

0
माणूस ज्या भूमीत, ज्या गावात-खेड्यात जन्मला त्या भूमीचा एकेक कण त्याला काशी, गया, मथुरा ह्यासम पवित्र-पावन असतो. तेथील काटेरी बोरीबाभळींना त्याच्या हृदयी पाईन-देवदारपेक्षाही वीतभर जास्तच उंची लाभलेली असते ! गाववेशीवरील म्हसोबा, वेताळ अन बिरोबा ही तर त्याची खरीखुरी ज्योतिर्लिंगे असतात ! बरड हे माझे गाव माझ्यासाठी प्रेमाचे तशा प्रकारे आहे. अन्यथा बरड गाव नावाप्रमाणे वैराण, उजाड आहे. ते सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. ते गाव पुणे-पंढरपूर ह्या राज्य महामार्गावर फलटणपासून पूर्वेस अठरा किलोमीटर अंतरावर आहे...

निंबाळकर घराणे : सत्तावीस पिढ्यांची कारकीर्द (Dynasty of the Nimbalkars)

फलटण हे फक्त चौऱ्याऐंशी गावांचे संस्थान. आकाराने आटोपशीर; परंतु त्याचा मान आणि दबदबा मोठा होता. फलटणमध्ये नाईक-निंबाळकर घराण्याची सत्ता सातशे वर्षे निरंकुशपणे होती. त्या राजघराण्याने एकूण सत्तावीस पिढ्यांच्या राज्यकर्त्यांची वैभवशाली कारकीर्द घडवली. प्रजाप्रिय घराणे म्हणून त्यांची ओळख होती. नाईक-निंबाळकर घराण्याचे मूळ इतिहासात नवव्या शतकात सापडते...

वटवाघळांचे डॉक्टर – महेश गायकवाड

डॉ. महेश गायकवाड हा एक झपाटलेला तरुण ! त्या अवलियाने भीतीचा आणि अंधश्रद्धेचा विषय असलेल्या वटवाघळांवर पीएच डी केली आणि निसर्गात राहून निसर्गाशी संवाद साधला. तो निसर्ग संवाद लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. लोक त्यांना ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणून ओळखतात...

सर्व जातिधर्माचा एकोपा जपणारा श्रीराम रथोत्सव

एकोपा हे फलटणच्या श्रीराम रथोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तो सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी, संस्थान काळात फलटण संस्थानच्या अधिपती श्रीमंत सगुणामाता यांनी सुरू केला. फलटणच्या या रथोत्सवातून भारतातील धर्म सहिष्णुतेचे दर्शन घडते. रथयात्रेचे स्वरूप सुरुवातीपासूनच मोठे भव्यदिव्य असे आहे. यात्रा जवळपास दहा दिवस चालते...

निंबळक गाव नाईक-निंबाळकरांचे (Nimbalak Village ‘Belongs to’ Naik-Nimbalkars)

निंबळक हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यात वसलेले गाव. ते पुणे-पंढरपूर महामार्गापासून तीन किलोमीटर आणि फलटणपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास. निंबाळकर हे निंबळक गावातील प्रसिद्ध घराणे...