Tag: धाराशिव
देव/नवस/बकरे… आणि धाराशिवचा दर्गा
धाराशिवजवळ दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर गड देवधरी नावाचे लहानसे खेडे आहे. डोंगराच्या खाली, अगदी दरीत असावे असे. त्या ठिकाणी नव्याने निर्माण झालेला दर्गा होता. आधी तेथे काही नव्हते, पण एका हुशार माणसाने त्याची वार्षिक जत्रा सुरू केली. त्याला गावच्या जत्रेचे स्वरूप मिळाले. म्हणायला तो देव कुणाचा तर मुस्लिमांचा आणि कंदुरी कोणाची तर वरिष्ठ हिंदूंची ! भारतीय समाज असा संमिश्र कौतुकाचा, भाविकतेने भारलेला आहे ! दर्ग्याला नवस बोलून कंदुरी करणारी हजारो कुटुंबे आहेत. त्यांच्या मनात, डोक्यात कोणताही धर्म नसतो. मजा अशी की देव, धर्म, इच्छा, नवस, बकरे, श्रद्धा यांचे अफलातून संयुग तयार झाले आहे...
‘तेर’चे त्रिविक्रम मंदिर (Trivikram Temple of Ter)
तेरगावातील त्रिविक्रम मंदिराची वास्तू विटांनी बांधलेली आहे. ती गावाच्या मध्यभागी आहे. ती वास्तू म्हणजे बौद्धधर्मीयांचा चैत्य असावा असे एक मत आहे. विटांनी बांधलेल्या चैत्याच्या ज्या दोन वास्तू ज्ञात आहेत त्यांपैकी एक तेरची मानली जाते...
संत गोरोबाकाका, तेर आणि साहित्यसंमेलन (Saint Goroba & Literary Event)
उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दोन नावांत सामावलेली आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगदंबा तुळजाभवानी आणि दुसरे नाव म्हणजे तेर गावचे ‘वैराग्यमहामेरु संत गोरोबाकाका'. गोरोबांच्या अभंगाशिवाय संतवाङ्मय पूर्ण होत नाही...
तेरचा प्राचीन वारसा
तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते...