Tag: जी.ए. कुलकर्णी
अठ्ठेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Eighth Marathi Literary Meet 1969)
वर्धा येथे 1969 साली झालेल्या अठ्ठेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कवी प्रा. पुरुषोत्तम शिवराम रेगे. ते नवकवितेत स्वतःचा वेगळा प्रवाह जपणारे तरल कवी, अल्पाक्षराच्या वाटेने जाणारे कादंबरीकार आणि समीक्षक-संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. रेगे यांनी ‘सुहृद चम्पा’ आणि ‘रूपकथ्थक’ या टोपणनावांनीही लिखाण केले आहे. रेगे हे मूलतः सर्जनशील कलावंत होते. त्यांनी त्यांच्या लेखनाला ‘बालमित्र’ नावाच्या हस्तलिखित मासिकातून सुरुवात केली...
‘मर्मभेद’ पुस्तक कोणाचे? .(Who is the author of the book, ‘Marmbhed’?)
‘मर्मभेद’ ही राजकारणाची कटकारस्थाने अशी कथा असलेली कादंबरी. ती मानवी प्रवृत्ती-विकृती, रूपकात्मक-प्रतीकात्मक अशा मांडणीतून उलघडत जाते. कथेची भाषाशैली संस्कृतप्रचुर, जड असली तरी तिच्या भावनानुसारी प्रवाहीपणामुळे वाचकाला संमोहित करत गुंतवून ठेवते...