Tag: चिंचोली गाव
विलास शिंदे यांची हाक, निसर्गासाठी ! (Vilas Shinde’s Efforts for Environment)
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास शिंदे हे शैक्षणिक पात्रतेनुसार व्हायचे मातब्बर प्राध्यापक; परंतु वास्तवात ते शिरले विद्यापीठ प्रशासनात आणि झाले कुलसचिव. अर्थात, त्याआधी उप, प्रभारी अशी कुलसचिवपदे त्यांना निभावावी लागलीच. एका अर्थाने तेही बरे झाले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठास उत्तम, अनुभवी प्रशासक लाभला, विद्यापीठाच्या टेकडीवर निसर्गसृष्टी बहरली, विद्यापीठ हे पाण्याने मालेमाल झाले; तेवढेच नव्हे तर संकटसमयी विद्यापीठ साऱ्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवू लागले ! विलास शिंदे यांच्यात एकाच वेळी शिक्षणप्रेमी प्राध्यापक, कुशल व्यवस्थापक, हाडाचा निसर्गवेडा आणि लेखनकुशल विज्ञानप्रसारक अशी चार व्यक्तिमत्त्वे लपली आहेत. मात्र लोकांच्या लेखी ते ‘पाणीवाला बाबा’ किंवा इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या कविमनाच्या व्यक्तीस ‘झाड कवेत घेणारा माणूस’ असतात...
अशोक जाधव यांचे कलादालन
कलासक्त चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक दादू जाधव यांनी स्वतः आर्थिक झळ सोसून कलाप्रेम जोपासण्याचे धाडस चिंचोली गावात केले आहे. ते गाव सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात आहे....