Tag: गुरू घनश्यामदास
नृत्यभूषण श्रीधर पारकर
महाराष्ट्रात नृत्यकलेला पन्नासच्या दशकात फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी पुरुष नृत्य कलाकाराला ‘नाच्या’ म्हणून हिणवण्यात येत असे. अशा काळात कुटुंब आणि समाजातील अपसमजांना डावलून वसईतील श्रीधर पारकर यांनी केलेली वाटचाल महत्त्वपूर्ण ठरते. पारकर पति-पत्नीने ‘नृत्यकिरण’ या संस्थेच्या माध्यमातून जवळपास सात दशके नृत्यसेवा केली...