Home Tags कवयित्री

Tag: कवयित्री

असोशीने जगणारी व लिहिणारी लेखिका : वासंती मुझुमदार

वासंती मुझुमदारम्हणजे लेखणी व कुंचला याचा दुर्मिळ संगम असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कवितेचा उत्कट प्रतिमासृष्टी, चपखल शब्दकळा हा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यात मानवी नाती व त्याचा परस्पर संबंध याचे मनोज्ञ दर्शन घडते. वासंती यांच्या कुंचल्याची कधी लेखणी होते, तर कधी लेखणीचा कुंचला होतो ते कळत नाही...

इंदिरा संतांकडील चंद्रमौळी हसू

मी कराडला कॉलेजात शिकत असताना दीक्षितसरांकडे म्हणजे प्रकाश संत यांच्या घरी जाणे ही आम्हाला- मला आणि माझ्या एका मैत्रीणीला पर्वणीच वाटे ! तेथे जाण्यासाठी आकर्षणे अनेक होती, पण त्यातील प्रमुख म्हणजे इंदिरा संत. त्यांचा अमलताश नावाचा बंगला होता...

अनुपमा उजगरे : लेखन आणि कार्य यांची अनोखी वीण (Literary Activist Anupama Ujgare)

14
लेखिका अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती लग्नानंतर पती निरंजन उजगरे व सासरे हरिश्चन्द्र उजगरे यांच्या प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली.

सरोज जोशी – फिदा स्वतःवर! (Tribute to Saroj Joshi, Poet)

मराठी कवयित्री सरोज जोशी यांना मराठी भाषा दिनी, 27 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर काहीसा आकस्मिक मृत्यू आला. त्या त्याआधी तीन महिने हॉस्पिटलात होत्या. पडल्याचे निमित्त झाले. त्यांचा मणका दुखावला व त्यांना बेड रेस्ट सुचवण्यात आली आणि त्यांना बिछान्यावर पडून राहवे लागले.