Home Tags कमलादेवी

Tag: कमलादेवी

नवरात्रीतील देवीचे महात्म्य

नवरात्रीतील देवीचे महात्म्य भक्तिभावाच्या अंगाने फारच वाढले असले तरी गावोगावची देवळे प्रसिद्ध आहेत, ती तेथील प्रथापरंपरांमुळे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर अशी सांस्कृतिक माहिती आपण संकलित करत असतो. यांपैकी कोणत्याही लेखाबाबत वाचकांकडे जादा माहिती असेल किंवा कोणत्या नव्या देवस्थानावर सांस्कृतिक महत्त्वाच्या अंगाने लेखन करण्याची इच्छा असेल; तर info@thinkmaharashtra.com या इमेल पत्त्यावर लिहावे वा ‘थिंक महाराष्ट्र’च्या नंबरवर फोन (9892611767) करावा...

जय देवी… आनंदी – रावरंभारचित आरती (Ravrambha’s devotional poem for Jagdamba)

शक्तिदेवतेचे जगदंबा हे नामांकन महाराष्ट्राने केले आहे. पराक्रमाची जोपासना करणाऱ्या अन्य शक्तिदेवता महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र तिच्या क्षात्रतेजाने अवघा धन्य झालेला आहे ! त्या जगदंबेच्या भक्तीचे वेड महाराष्ट्राच्या रोमरोमात भिनले आहे. रणांगणावर बेफाम तलवारबाजी करणारा हातदेखील तलवार बाजूला ठेवून, या आदिमायेची स्तोत्रे रचण्यासाठी लेखणी धरतो असे उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये तो चमत्कार अठराव्या शतकात घडला. एक सरदार आदिमायेच्या भक्तीने वेडा होऊन, चक्क कवी बनला ! त्या सरदाराचे नाव आहे रंभाजीराव ऊर्फ रावरंभा निंबाळकर...

कमलादेवीचा कार्तिकोत्सव

रंभाजीराव बंडखोर वृत्तीचे होते. त्यांनी उत्तर आयुष्यात हातातील समशेर खाली ठेवली व लेखणी हातात घेतली. त्यांनी आदिशक्तीचे कलापूर्ण मंदिर करमाळा येथे बांधले. कमलादेवीच्या उत्सवाचा मुख्य दिवस कार्तिक वद्य चतुर्थीस असतो. त्या पूर्वी चार दिवस म्हणजे कार्तिकी पौर्णिमेपासून यात्रेची सुरुवात होते...