Home Tags आंबोळगड

Tag: आंबोळगड

आंबोळगड – प्रतिगोवा !

आंबोळगड हे आमचे गाव कोकणाच्या राजापूर तालुक्यात रत्नागिरीपासून पन्नास किलोमीटर आणि राजापूरपासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. ते तीन बाजूंनी समुद्राच्या कुशीत वसले आहे. एकीकडे डोंगरकड्याशी कठोर झुंजणाऱ्या सागरलाटा आणि दुसरीकडे वाळूशी पदन्यास करणाऱ्या सागरलाटा… दोन्ही विभ्रम एकाच ठिकाणाहून दिसतात. निसर्गराजाची अशी नानाविध रूपे तासन् तास न्याहाळत बसावे, असे आहे हे आंबोळगड गाव. गावाचे क्षेत्रफळ दोनशे एकर आहे. गावात शिवकालीन इतिहासाची शौर्य परंपरा, गौरवशाली संस्कृती यांची यशोगाथा सांगणारा पुरातन किल्ला आहे. किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर व तोफा आहेत. तटबंदी छोटी असली तरी मजबूत आहे. त्या किल्ल्यामुळेच गावाला आंबोळगड असे नाव पडले...