Tag: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
वक्ता दशसहस्रेषु… प्राचार्य राम शेवाळकर
राम बाळकृष्ण ऊर्फ ‘राम शेवाळकर’. ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातकीर्त वक्ते, अध्ययन-अध्यापन-शैक्षणिक प्रशासन यांशी निगडित; तसेच, कला-साहित्य-संस्कृतीविषयक अशासकीय स्वायत्त विविध मंडळांचे सदस्य, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...
मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान
अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...
ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेचा जाहीरनामा! (What Dnyaneshwar wants to say about Marathi language and it’s...
ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतील सौंदर्यभाव जसा खुलवून सांगितला, तितक्याच महात्म्याने साहित्यातील विवेकमूल्याची निकड प्रतिपादन केली. त्यांच्यानंतरच्या संतपरंपरेने मराठी साहित्याला व विचारविश्वाला विवेकाचा पाया घालून दिला. म्हणूनच सदानंद मोरे त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून ज्ञानेश्वरीमधील बाराव्या अध्यायातील नमनाच्या काव्यपंक्तींना ‘मराठी भाषेचा जाहीरनामा’ म्हणत आहेत…