गोपाळकृष्ण गोखले यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान बहुमुल्य आहे. ते बहुविध गुणांनी नावाजले गेले होते - भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे नेमस्तवादी पुढारी, उत्कृष्ट संसदपटू, देशभक्त राजकारणी, तर्कशुद्ध मांडणी शांतपणे करणारे अभ्यासू अर्थतज्ञ,
प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांतील फरक काय? सर्वसामान्यपणे असे बोलले जाते की प्रमाण भाषा ती असते जी लिहिली आणि बोललीदेखील जाते. बोलीभाषा ही फक्त बोलली जाते.
झाडीपट्टी म्हणजे पूर्व विदर्भ. जुन्या सी.पी. ॲण्ड बेरार प्रांतामधील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे चार जिल्हे; तथा सध्याच्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याचा मौदा-रामटेककडील काही भाग त्यात येतो.
हिरा डोंगरी हा दक्षिण आणि उत्तर वसई यांना जोडणारा दुवा होय. ती शंभर-दीडशे फूट उंचीची टेकडी वसई तालुक्याच्या गिरीज आणि भुईगाव या दोन गावांच्यामध्ये उभी आहे. ते ठिकाण चिमाजी आप्पा यांनी सार्या वसईवर नजर ठेवण्यासाठी निवडले होते.
अमला रुईया हे व्यक्तिमत्त्व भारतात पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये परिचित आहे. त्या या कार्याकडे राजस्थानात पडलेल्या दुष्काळांनी (1999-2000 आणि 2003) वळल्या.
नाताळचा सण येऊन गेला, की वसईच्या ख्रिस्ती समाजात लग्नाचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे शहरभर जल्लोषाचे नि उत्साहाचे वातावरण असते. तो उत्साह 2020 साली कोरोनाचे सावट असल्याने झाकोळून गेला.
सोफिया डॉब्सन कॉलेट ही स्त्री ब्रिटनमध्ये एकोणिसाव्या शतकात होऊन गेली. तिने भारतीय राजा राममोहन रॉय यांच्या कार्याचा ध्यास असा घेतला, की मला राधा आणि कुब्जा या मिथकांची आठवण झाली!
सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 हद्दपार करून दोन वर्षे (निकाल सप्टेंबर 2018) होऊन गेली. त्या निर्णयाने क्वीअर एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या जीवनात बरेच बदल झाले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) हे शहर अलिकडे ‘झाडीवूड’ म्हणून नावारूपास येत आहे. मुंबईला जसे ‘बॉलिवूड’, तसे विदर्भाच्या झाडीपट्टीतील वडसा हे ‘झाडीवूड’. बॉलिवूड हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, तर झाडीवूड मात्र नाटकांसाठी.
वसईची सुकेळी हा एके काळी आकर्षणाचा बिंदू होता. वसई हे पालघर जिल्ह्यातील मुंबई शहराजवळचे जुने गाव. वसईत भातशेतीच्या जोडीला फुलांच्या आणि केळीच्या बागा होत्या. वसईवर त्या काळी हिरव्यागर्द केळींचे अधिराज्य होते;