Home Search

node - search results

If you're not happy with the results, please do another search

एकोणिसावे साहित्य संमेलन – Nineteenth Marathi Literary Meet 1933)

एकोणिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे होते. ते संमेलन नागपूर येथे 1933 साली भरले होते. खाडिलकर यांची ख्याती थोर नाटककार, झुंझार पत्रकार आणि लोकमान्य टिळक यांचे अनुयायी व देशभक्त अशी होती.

अठरावे साहित्य संमेलन (Eighteenth Marathi Literary Meet 1932)

अठराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे होते. ते संमेलन कोल्हापूर येथे 1932 साली भरले होते. मात्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सयाजीराव गायकवाड संमेलनाला हजरच राहू शकले नाहीत !

चंद्रपूरचे सृजन- सांस्कृतिक यज्ञाचे तप ! (Srujan – Unique Cultural Platform From Chandrapur)

नाशिकचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 26-27-28 मार्चला होऊ शकले नाही, परंतु त्याच तारखांना नाशिकहूनच एका आभासी साहित्य संमेलनाची सूत्रे हलवली गेली आणि ते तिन्ही दिवस एक झकास मराठी साहित्य संमेलन घडून आले ! ते योजले होते चंद्रपूरच्या ‘सृजन’ संस्थेने आणि त्याचे सूत्रसंचालन केले होते मृणाल पात्रीकर-धर्माधिकारी यांनी, नाशिकहूनच...

सतरावे साहित्य संमेलन (Seventeenth Marathi Literary Meet – 1931)

हैदराबाद येथे भरलेल्या सतराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर हे होते. केतकर हे मराठी भाषेतील कोशयुगाचे प्रवर्तक होत. त्यांचे आयुष्य ज्ञानाच्या उपासनेतच व्यतित झाले. त्यांनी ‘गोविंदपौत्र’ या टोपणनावाने कविता लिहिल्या...

अंध मनोहर वास्वानी यांची शैक्षणिक दृष्टी (Manohar Vaswani Defeats Blindness and Succeeds in Higher...

मनोहर सन्मुखदास वास्वानी यांनी त्यांच्या अंधत्वावर मात करून मिळवलेले यश हे स्तुत्य असे आहे. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबात 1975 साली नागपूर शहरात झाला.

पंधरावे साहित्य संमेलन (Fifteenth Marathi Literary Meet – 1929)

बेळगाव येथे भरलेल्या पंधराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे हे होते. ते स्वातंत्र्याच्या चळवळीतील आघाडीचे वक्ते, तरुण पिढीला आकर्षित करणारी लेखनशैली असलेले स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होते.

महाराष्ट्र – भारताचे ‘चौदावे रत्न’ (Maharashtra State is Born – Atre Narrates the story)

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांनी व्यक्तिश: आणि त्यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकाने व ‘दैनिक मराठा’ यांनी अतुलनीय कामगिरी केली. अत्रे यांनी ‘नवयुग’मध्ये 1 मे 1960 रोजी लिहिलेला लेख.

कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)

"ज्या वेळी संग्रहाचं, जतनाचं हे काम तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटेल तेव्हा मला कळवा." लंडन युनिव्हर्सिटीचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी मला आश्वासक सुरात पाठिंबा दिला...

गाविलगड – स्थलानुरूप जल नियोजनाचा वारसा (Gavilgad – Bahamani fort is known for its...

गाविलगड किल्ला हे विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. तो सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यावर येतो. मेळघाटातील डोंगरद-यांमध्‍ये विखुरलेली किल्‍ल्‍याची व्यापकता आणि गडावरील वास्तुशिल्पातील कलाकुसर पाहून मन थक्‍क होऊन जाते.

भीमसेन जोशी – शेरच तो ! (Remembering Bhimsen Joshi on his birth centenary)

पंडित भीमेसन जोशी यांच्या जन्माला नव्याण्णव वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 ला कर्नाटकात झाला. पण समस्त महाराष्ट्रीयनांच्या व भारतीयांच्या मनात, हृदयांत भीमसेन आहेत ते पुण्याचे.