समाजमाध्यमांमध्ये विनोदी, गोड दिसणाऱ्या इमोजींचा वापर सहज आणि नित्याचे झाले आहे. विविध हृदये, रडके-दुःखी चेहरे, 'ब्लोईंग किसेस'... आणि अशा अडीचशेहून अधिक भावचिन्हांच्या मदतीने भावना व्यक्त करता येतात. मात्र ती पद्धत साचेबंद होत आहे का? उलट या चेहेऱ्यांमुळे खऱ्या भावना व्यक्त होणे नाहीसे झाले आहे...