हेमाद्रीपंडिताचे नाव ऐतिहासिक संदर्भात वारंवार येते. तो हेमाडपंत म्हणूनही ओळखला जातो. हेमाद्री पंडिताचे नाव बांधकाम शैली व मोडी लिपी या संदर्भात विशेष घेतले जाते. त्याने बांधलेली मंदिरे ‘हेमाडपंती’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
आदिमानव राहत होता तो सुमारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वीचा महापाषाणकाळ. त्यावेळी कोणत्याही आदिमानवाचा मृत्यू झाला, की त्याची आठवण म्हणून ज्या ठिकाणी त्याला गाडण्यात येई, त्या ठिकाणी फार मोठी दगडाची शिळा उभारली जात असे.
सांबार हा शब्द इडली-वडा-डोसा यांच्याबरोबर जोडून येतो. दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगण या प्रांतांतील खासीयतअसलेले इडली सांबार, वडा सांबार हे पदार्थ जगभरात पोचले आहेत.
मुंबईतील जोगेश्वरीची ‘सरस्वती बाग’. त्या गृहनिर्माण सोसायटीच्या स्थापनेला 2019 साली शंभर वर्षें पूर्ण झाली. गजबजत्या जोगेश्वरी स्थानकापासून पूर्वेकडे जेमतेम आठ-दहा मिनिटे चालले, की उजव्या हाताला ‘सरस्वती बाग’ ही दगडी बंगल्यांची वसाहत दिसते.
त्यांचे नाव आहे नसीमा हुरझूक! नसीमा यांनी स्वत: अपंग असून, असंख्य अपंगांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे, सक्षम बनवले आहे - शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्याही. नसीमा या ‘हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड’ या कोल्हापूरच्या संस्थेच्या संस्थापक आहेत. ती संस्था त्यांनीच निर्माण केली आहे.
पुण्याच्यामाऊली पानपट्टीने पुणेकरांच्या जीवनात दोन-पाच वर्षांत वेगळेच स्थान मिळवले आहे. पौड रोडवरील पानाच्या टपरीपासून सुरू झालेला पानपट्टीचा तो ब्रँड आता पुण्यात पाच ठिकाणच्या दुकानात मिळतो. थुंकण्याची गरज नसलेले व पचनाला पोषक अशा
अमेरिकेत मराठी शाळा गेली काही दशके चालू आहेत. त्यांचे स्वरूप अनौपचारिक रीत्या भरवलेले वर्ग असे अनेक वर्षे होते. ते आता सुसूत्र संघटित केले जात आहे. त्यासाठी खास अभ्यासक्रम आखला गेला आहे.
मराठी नाट्य व्यवहार आजच्या इतका मोठा (आर्थिक परिमाणात) झाला नव्हता तेव्हाची ही गोष्ट आहे. माधव मनोहर नावाचे नाट्यसमीक्षक 'सोबत' या साप्ताहिकात पंचम या सदरातून ज्याला समीक्षा म्हणता येईल अशा स्वरूपाचे लेखन करत असत.
कराड येथील सेवायोग सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षी सृजन यात्रेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्था, आदर्श व्यक्ती यांच्याशी भेट आणि संवाद साधणारी सामाजिक सहल म्हणजेच सृजन यात्रा.
नगरी बोली ही ठळकपणे उठून दिसणारी नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरीया मराठीच्या बोलींना जसे स्थान लाभले तसे नगरी बोलीला मिळालेले नाही. पण ‘काय करू राह्यला?’,