साने गुरुजी संकेतस्थळाचे लोकार्पण

साने गुरुजी संकेतस्थळाचे लोकार्पण
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन

महाराष्ट्रात असंख्य धडपडणारी मुले जमवून नवजागरणाचे वारे घुमवणाऱ्या साने गुरुजींचा 11 जून हा स्मृतीदिन. त्यांनी देहत्याग 11 जून 1950 रोजी केला. आजही साने गुरुजींच्या विचारांची आणि आचाराची स्मृती अनेकांच्या मनात जागी आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या मनावर संस्कार करण्यासाठी लेखणी अखंड झिजवली. गुरुजींच्या नावावर अनेक कथा, कविता, कादंबऱ्या, वैचारिक निबंध, असंख्य भाषांतरे; असे विपुल साहित्य आहे.

गुरुजींचे सर्व साहित्य वाचकांना एके ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या साने गुरुजींच्या समग्र साहित्याच्या संकेतस्थळाचे आज लोकार्पण करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर वाचकांना त्यांच्या साहित्याबरोबरच गुरुजींचे संक्षिप्त चरित्र वाचायला मिळेल. गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे बाह्य कडीच्या (External link) आधारे विविध पैलू दर्शवणारे अनेक लेख, प्रबंध व ग्रंथही विनामूल्य वाचता येतील.

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1960 साली झाली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ अशा विभिन्न सांस्कृतिक चालीरीतींचा परंतु मराठी भाषेच्या धाग्याने एकसंध बांधलेला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. महाराष्ट्राला एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विशेषत: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक विचारवंतांनी व कार्यकर्त्यांनी केले होते. 1900 ते 1930 या तीस वर्षांच्या कालखंडात जन्माला आलेल्या विविध क्षेत्रातल्या अनेक लोकोत्तर व्यक्तींच्या जन्मशताब्दीची वर्षे या नजीकच्या काळात साजरी झाली आणि येत्या दोन चार वर्षात साजरी होतील.

महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या असामान्य व्यक्तींचे कार्य आजच्या पिढीसमोर सतत  राहायला हवे या उद्देशाने ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने त्यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती देणारी सविस्तर ‘संकेतस्थळे’ तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. संकेतस्थळावर या व्यक्तींचे चरित्र, विचारधारणा, कार्य, दुर्मिळ दस्तावेज, फोटो  इत्यादी साहित्य संग्रहित केले जाईल. अशा तीनशेहून अधिक असामान्य व्यक्तींची यादी करण्यात आली आहे. ज्या मुख्य संकेतस्थळावर प्रत्येक व्यक्तीविषयीच्या लिंक उपलब्ध असतील त्या संकेतस्थळाला ‘महाभूषण’ असे नाव देण्यात आले आहे.

या प्रकल्पाचा शुभारंभ म्हणून साने गुरुजींवरील संकेतस्थळाचे लोकार्पण आज होत आहे. वाचक www.mahabhushan.com याद्वारे संकेतस्थळाला भेट देऊ शकतील. गुरुजींचे संक्षिप्त चरित्र, गुरुजींनी लिहिलेल्या एकशे साठपेक्षा अधिक कविता, पंधराहून अधिक कदंबऱ्या, ग्रंथ इत्यादी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यात सतत नवीन संदर्भ साहित्य अपलोड करण्याचा संस्थेचा प्रयत्न असेल.

जगभर पसरलेले मराठी संस्कृतीचे चाहते या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद देतील असा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ला विश्वास वाटतो.

टीम व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here