Home Search

वाचनालय - search results

If you're not happy with the results, please do another search

कोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर ! (Dabhols Historian Anna Shirgaonkar)

अनंत धोंडूशेठ शिरगावकर हे अण्णा शिरगावकर या नावाने कोकण परिसरात ओळखले जात. त्यांनी शिक्षण, सहकार, कामगार संघटना, अपंगांसाठीच्या संस्था, वाचनसंस्कृती, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र, कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध अशा विविध विषयांत मैलाचे दगड ठरतील असे संशोधन व लेखन कार्य केले आहे. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1930 गुहागरमधील विसापूर गावचा. त्यांना मृत्यू वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी 11 ऑक्टोबर 2022 रोजी आला...

आधुनिक अचलपूरचे शिल्पकार – बाबासाहेब देशमुख (Architect of Modern Achalpur – Babasaheb Deshmukh)

1
अचलपूरच्या सामाजिक-सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय या क्षेत्रांत देशमुख कुटुंबाचे योगदान मोलाचे आहे ! बाबासाहेबांनी इंग्रजीराजवटीत अचलपूरनगरीच्या प्रगतीसाठी आधुनिकतेचा ध्यासघेऊन सर्वात प्रथम अचलपूरमध्ये सार्वजनिकवाचनालय, विविध शिक्षण संस्था, कापड गिरणी, आयुर्वेदऔषधालय स्थापन करून अचलपूर नगरी अधिक विकसित केली…

शिवसंदेशकार हरिभाऊ निंबाळकर

कॉ.हरिभाऊ निंबाळकर हे फलटण नगरपालिकेपासून राज्याच्या विधानसभेपर्यंत, कामगारांच्या विविध प्रश्नांपासून अनेक क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी लढणारे झुंजार व्यक्तिमत्त्व होते. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा आमदार होते...

प्रमोद झिंजाडे – विधवा प्रथा निर्मूलनाचे प्रवर्तक (Pramod Zinjade – Modern day social reformer)

प्रमोद झिंजाडे ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती. ते परिवर्तनवादी आहेत. त्यांनी समाजातील अनिष्टतेवर दंड उगारला आणि न्याय्य गोष्टी घडवून आणल्या. त्यांच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या संकल्पनेने विधवा महिलांना आनंदी जीवनासाठी आशेचा किरण दाखवला आहे...

हेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले! (Herwad Village is charged with reforms for better treatment...

समाजाच्या चौकटी मोडणे सहजशक्य नसते परंतु संपूर्ण गाव एकत्र आले तर काय करू शकते, याचा आदर्श हेरवाडच्या ग्रामस्थांनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव संमत करून घालून दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे. ‘गाव करेल ते राव काय करील’ ही उक्ती हेरवाडकरांनी सार्थ ठरवली आहे...

पुरोगामी विचारांचा वारसा – सासकल

फलटण तालुक्यातील सासकल हे एक छोटेसे गाव. त्या गावातील ग्रामस्थ ग्रामविकासाबाबत सजग आहेत. पारंपरिक धर्मभावनेला आधुनिक विचारांची जोड देणाऱ्या सासकल या गावाने त्याचा ठसा क्रीडा क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे...

‘मर्मभेद’ पुस्तक कोणाचे? .(Who is the author of the book, ‘Marmbhed’?)

‘मर्मभेद’ ही राजकारणाची कटकारस्थाने अशी कथा असलेली कादंबरी. ती मानवी प्रवृत्ती-विकृती, रूपकात्मक-प्रतीकात्मक अशा मांडणीतून उलघडत जाते. कथेची भाषाशैली संस्कृतप्रचुर, जड असली तरी तिच्या भावनानुसारी प्रवाहीपणामुळे वाचकाला संमोहित करत गुंतवून ठेवते...

अंजनवेलचे निसर्गसौंदर्य (Anjanvel the Beautiful natural Konkan Town)

निसर्गसौंदर्याने नटलेले अंजनवेल गाव पर्यटकांना जास्त आकर्षित करते, ते गावातील गोपाळगड, दीपगृह व श्री टाळकेश्वर मंदिर या स्थळांमुळे ! गावाला लाभलेला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, मनाला भुरळ घालणारा समुद्र व आजुबाजूचा विलोभनीय परिसर शब्दातीत आहे…

शालेय शिक्षणक्रमात नैतिक मूल्ये !

समाजात गुन्हेगारी वाढू नये याकरता मुलांना शालेय वयापासून नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे असे म्हणणे कोल्हापूर येथील कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांचे आहे. ते राष्ट्रपती पदकाने तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित अधिकारी आहेत...

शस्त्रास्त्रांचे पुलगाव

पुलगाव हे महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीकाठी वसलेले आहे. त्या गावाला लागून वर्धा नदी वाहते. वर्धा नदीच्या अलीकडे वर्धा जिल्ह्याची सीमा तर पलीकडे अमरावती जिल्ह्याची सीमा आहे. नदीचे पात्र विस्तृत असल्याने दोन्ही बाजूला जोडणारा एक रेल्वे पूल आहे. पुलगावला रेल्वे पुलाच्या जवळ असल्याने त्याला पुलगाव अर्थात पुलावर वसलेले गाव हे नाव पडले...