Home Search
देवी - search results
If you're not happy with the results, please do another search
टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी
कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी.
भुजाईदेवी हे जागृत देवस्थान...
श्री देवी भगवती, मुक्काम कोटकामते!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडपासून तीस किलोमीटर अंतरावर कोटकामते हे निसर्गरम्य, टुमदार गाव आहे. पूर्वी त्या गावी एक किल्ला होता. त्याचे अवशेष म्हणून गावात प्रवेश करताना...
देवीदेवतांपासून भ्रष्टाचार
निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडवला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी एक शारीरिक विशेष गुण किंवा अवयव दिला आहे. मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही. त्याऐवजी त्याला बुद्धिसामर्थ्य दिले आहे. बुद्धिसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा देऊन टाकले आहे! आणि इथेच खरी मेख आहे. हे व्यक्तीनिहाय स्वातंत्र्य हेच मानवजातीच्या सबंध वर्तनाचे आणि गैरवर्तणुकीचे कारण ठरले आहे, आणि या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे...
सरस्वतीदेवीची सामाजिक कृतज्ञता
मुंबईच्या दादर येथील सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट ने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेचे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ‘प्रियदर्शनी’ फाऊंडेशनतर्फे तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला...
बाप रखुमादेवीवरू
बाप रखुमादेवीवरू
आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं...
घंटीबाबांची दिग्रस नगरी कापसाची पंढरी
दिग्रस हा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी एक. दिग्रस हे शहर पूर्वी ‘डिग्रस’ म्हणून ओळखले जात असे. त्याचे दिग्रस हे नाव कसे पडले, याबाबत काही दंतकथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेथील झाडापासून डिंकाचा रस जास्त मिळत असल्याने त्याचा अपभ्रंश डिग्रस असा झाला. कोणी ‘ग्रेसफुल’ अर्थाने, तर कोणी ‘दि ग्रेट’ अर्थाने दिग्रस या शब्दाचा अर्थ सांगतात. दिग्रस हे शहर यवतमाळपासून बहात्तर, अमरावतीपासून एकशेचौदा, तर नांदेडपासून एकशेअडतीस किलोमीटर अंतरावर आहे. दिग्रसने स्वत:चा वेगळा ठसा कृषी, राजकारण, कला, क्रीडा, अध्यात्म, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उमटवला आहे...
सातवाहन – महाराष्ट्रातील पहिले राजघराणे
सातवाहन हे महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले राजघराणे. त्यांचा कार्यकाळ इसवी सनपूर्व 235 ते इसवी सन 225 पर्यंतचा आहे. साधारणतः साडेचारशे वर्षे. सिमुक या सातवाहन राजाने त्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली तर त्याचा पुत्र सिरी सातकर्णी या कर्तृत्ववान राजपुरुषाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. सातवाहन घराण्याच्या सिमुक सातवाहनानंतर राजगादीवर आलेला हा दुसराच राजा होता. असे असताना त्याने त्याच्या कर्तृत्वाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. राजाचे कर्तृत्व नागनिका राणीने कोरवून घेतलेल्या नाणेघाट लेण्यातून कळते. सातकर्णी राजाची राणी ‘नागनिका’ ही त्या काळातील पहिली कर्तबगार ज्ञात स्त्री...
पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !
गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...
वैभवशाली लातूर (Latur’s cultural affluance)
मला लातूर, कानापूर-मोहा आणि मुंबई ही गावे व्यक्तिगत जिव्हाळ्याची वाटतात. लातूर हे माझे जन्मगाव. लातूर सध्या शिक्षणवर्गांसाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून गाजत असते. माझे लातूरशी भावनिक नाते आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथे झाले. बीड जिल्ह्यातील कानापूर-मोहा हे माझे वडिलोपार्जित गाव. मी उच्च शिक्षण व व्यवसायक्षेत्र म्हणून मुंबई महानगराशी ममत्वाने जोडला गेलो आहे. देश आणि राज्य स्तरावर नोंद घेता येईल असा भौगोलिक वा नैसर्गिक समृद्धीचा वारसा न लाभलेले लातूर गाव ! मात्र ते भूकंपामुळे सर्व जगास परिचयाचे झाले. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असल्याने लातूर गावाचा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन आढावा घेत आहे. लातूर गावास प्रागैतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ती तेथे प्राप्त झालेल्या शिलालेखांतून सिद्ध होते...
कशेळीचा कनकादित्य (Kanakaditya the sun temple from Kasheli)
सूर्यमूर्ती या भारतात इसवी सनापूर्वी दोन शतकांत घडवण्यात येऊ लागली. सूर्याचे देव म्हणून महत्त्व इसवी सनाच्या चौथ्या, पाचव्या शतकात, म्हणजे गुप्त काळात वाढत गेले आणि उपासना मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी या गावी ‘कनकादित्य’ नावाने सूर्य मंदिर प्रसिद्ध आहे. ते मंदिर सुमारे एक हजार वर्षे पुरातन आहे. कशेळी गावाजवळ असलेले आडिवरे गाव मुचकुंदी नदीच्या खाडीच्या मुखाशी वसलेले आहे. आडिवरे या नावाची उपपत्ती आदितवाड म्हणजे जेथे सूर्योपासना होती ते गाव अशी असल्याचे पुरातत्त्व खात्याच्या संशोधन पत्रिकेत म्हटले आहे...