Home Search
निसर्ग - search results
If you're not happy with the results, please do another search
वाडातरचे निसर्गरम्य हनुमान मंदिर
निसर्गरम्य कोकणात देवगडपासून सहा किलोमीटर अंतरावरील वाडा गावात वाडातर ही वाडी आहे. तेथे अगदी समुद्रालगत भराव टाकून, डोंगराच्या पायथ्याशी माडांच्या कुशीत बांधलेले प्रेक्षणीय श्रीक्षेत्र...
निसर्गाच्या कुशीतील विमलेश्वर मंदिर
विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाडा हे 'संस्कृतिकोशा'चे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद...
निसर्गरम्य बाली
निसर्गरम्य बाली – स्मिता गिरी.
इंडोनेशियाचे बाली बेट अनुपम सौंदर्याने नटलेले आहे. ते पंच्याण्णव टक्के हिंदू असलेले इंडोनेशियातील एकमेव बेट! हजारांपेक्षा जास्त मंदिरे असलेल्या बेटाच्या...
निसर्गसंवर्धनाचे नवे मॉडेल
निसर्गाचा अभ्यास, त्याचा उपयोग प्रत्यक्ष जमिनीवर करणे व त्यासाठी त्याला व्यावसायिकतेची जोड देणे असे तिहेरी आव्हान केतकी घाटे व मानसी करंदीकर ह्या...
हरियाली – निसर्ग फुलवण्यासाठी
झाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून...
घंटीबाबांची दिग्रस नगरी कापसाची पंढरी
दिग्रस हा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी एक. दिग्रस हे शहर पूर्वी ‘डिग्रस’ म्हणून ओळखले जात असे. त्याचे दिग्रस हे नाव कसे पडले, याबाबत काही दंतकथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेथील झाडापासून डिंकाचा रस जास्त मिळत असल्याने त्याचा अपभ्रंश डिग्रस असा झाला. कोणी ‘ग्रेसफुल’ अर्थाने, तर कोणी ‘दि ग्रेट’ अर्थाने दिग्रस या शब्दाचा अर्थ सांगतात. दिग्रस हे शहर यवतमाळपासून बहात्तर, अमरावतीपासून एकशेचौदा, तर नांदेडपासून एकशेअडतीस किलोमीटर अंतरावर आहे. दिग्रसने स्वत:चा वेगळा ठसा कृषी, राजकारण, कला, क्रीडा, अध्यात्म, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उमटवला आहे...
बाळकोबा भावे – विनोबांचे अनुज
बाळकोबा हे विनोबा भावे यांचे धाकटे बंधू. त्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झाले होते. ते गांधीजींच्या उरळी कांचन या निसर्गोपचार आश्रमाचे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकीक मोठा आहे. त्यांनी ब्रह्मसूत्र व पातंजल योगदर्शन यांसारख्या ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांनी त्यांतील अनावश्यक भाग वगळला व ग्रंथाचा नवा आशय प्रतिपादित केला. त्यांनी गीतेवरही विस्तृत भाष्य लिहिले आहे. बाळकोबांनी गांधीजी आणि विनोबा यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. त्यांनी ‘अभंग व्रते’ या शीर्षकाने विस्तृत ग्रंथ लिहिला. गांधीजींची एकादश व्रते आणि विनोबांनी त्यावर लिहिलेले पद्यबद्ध निरुपण हा त्या ग्रंथाचा विषय आहे...
पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !
गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...
आनंदप्रवासी रवींद्र पिंगे
रवींद्र पिंगे हे मराठीतील नेटाने, सातत्याने, उमाळ्याने लेखन करणारे साहित्यिक होत. त्यांनी मुख्यतः ललित लेखन केले. त्यांनी कथा-कादंबरी हे वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत; पण ते वाचकप्रिय ठरले ते त्यांच्या छोटेखानी, प्रसन्न, उत्कट ललित लेखनामुळे. पिंगे यांनी पन्नासहून अधिक वर्षे, कोऱ्या कागदाच्या हाका ऐकत लेखणीचे वल्हे डौलाने वल्हवले. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हे समर्थ रामदासांचे सांगणे पिंगे यांच्याइतके कोणी मनावर घेतले नसेल. ते ‘लिहा, सतत लिहीत राहा’ असे ‘पेर्ते व्हा’च्या चालीवर सांगत असत आणि त्यांनी स्वतःही लिहिण्याचा तो वसा जपला...
गोपीनाथ पाटील : ठाणे-कळव्याचे ध्यासपर्व (Gopinath Patil’s dedicated work for Kalawa area)
ठाण्याजवळच्या कळवा गावचे गोपीनाथ पाटील हे ध्येय व ध्यास घेऊन सार्वजनिक जीवनात वावरले. त्यांच्या कार्यासाठी त्यांचे परवलीचे सूत्र होते, सहकार ! तेच कार्यसूत्र, खरे तर, स्वातंत्र्योत्तर काळातील संस्था, उपक्रम यांच्या स्थापनेत होते. गोपीनाथ यांच्यामुळे अनेक उपक्रम स्वतःच्या पायावर कळवा परिसरात भक्कमपणे उभे आहेत. ती त्यांच्या कार्याची पावती होय.
ते ज्या कळवा गावात राहत होते ते गाव ठाणे या शहराला लागून असूनसुद्धा अनेक सुविधांपासून दूर होते. कळवावासीयांना दैनंदिन व्यवहारिक गरजा भागवण्यासाठी ठाण्याची वाट तुडवण्याला पर्याय नव्हता. कळव्यातील ते अंधारयुग नष्ट करण्यासाठी आंतरिक तळमळीने उभे राहिले ते गोपीनाथ पाटील. त्यांच्या सार्वजनिक कार्यातून उभ्या राहिल्या अनेकानेक संस्था...