Home Search

धुळे - search results

If you're not happy with the results, please do another search

दिन दिन दिवाळी: गाई-म्हशींचाही सण! (Diwali in Chaugaon Village in Old Days)

5
दिवाळीच्या दिवसांत, गाई-म्हशींना ओवाळण्याची पद्धत आमच्या चौगांवमधे माझ्या लहानपणी होती आणि मी स्वतः काही वर्षे गाई–म्हशींना ओवाळण्याचे काम केले आहे. #चौगाव हे धुळे जिल्ह्यात त्याच नावाच्या तालुक्यात आहे. माळी समाज हा इतर समाजांपेक्षा जास्त पुढारलेला समजला जाई. दूध देणारे पशू हे आमच्या समाजासाठी देव होत. म्हणून गाईगुरांना विशेष मान आमच्या गावात दिवाळीच्या सणाला असायचा. दिवाळी हा जसा भाऊबहिणीचा सण असतो तसा तो आमच्या गावात गाई-म्हशींचापण सण असायचा...

हेमाद्रिपंत या नावाचे गूढ? (Who Was Hemadripant)

हेमाद्रीपंडिताचे नाव ऐतिहासिक संदर्भात वारंवार येते. तो हेमाडपंत म्हणूनही ओळखला जातो. हेमाद्री पंडिताचे नाव बांधकाम शैली व मोडी लिपी या संदर्भात विशेष घेतले जाते. त्याने बांधलेली मंदिरे ‘हेमाडपंती’ या नावाने प्रसिद्ध आहेत.

शेषराव घाटगे – पत्रे, देशभक्ताची व प्रेमवीराची (Patriot Sheshrao Ghatage)

शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांच्या चरित्रसाधनांवर 2011 ते 2012 या शताब्दी वर्षात प्रकाश पडला! त्यांचा चरित्रग्रंथ एकशेदोन वर्षांनी (मरणोत्तर एकोणसत्तर वर्षांनी) प्रसिद्ध झाला...

बडोद्यातील विनाशकारी प्लेग, 1896 (KILLER PLAGUE 1896 IN VADODARA)

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर महाराष्ट्र व मराठी माणूस यांबाबतची विविध तऱ्हांची माहिती आपल्याला संकलित करायची आहे. काही ऐतिहासिक महत्त्वाचा डेटादेखील गावोगावाहून, स्थानिक पातळीवरील प्रयत्नांतून उपलब्ध होऊ शकतो.

शिरपूर पॅटर्न पाणी चळवळ बनू शकेल? (Shirpur Pattern)

मे महिना संपत आला तरी या, 2020 साली पाणीटंचाईच्या, गावागावांना टँकरने पाणी पुरवल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत! त्यांची जागा कोरोनाने व्यापली आहे हे खरे; परंतु त्याचप्रमाणे, पाऊस 2019 साली सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत रेंगाळला होता. काही प्रदेशांत तर महापुराने थैमान घातले होते.

राहतच्या स्नेहप्रेमाने सुखावले लॉकडाऊनमधील कष्टी वाटसरू (Lockdown Period Rahat Center)

नगरच्या 'स्नेहालय'चे गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या संलग्न विविध संस्थांनी एकत्र येऊन नगर-मनमाड रस्त्यावर राहत केंद्राची सुरुवात केली. राहत केंद्रातर्फे परराज्यातील मजुरांच्या नाष्ट्या-खाण्या-पिण्याची-प्रवासाची सोय केली जात आहे. तेथे कार्यकर्त्याना आलेले अनुभव शब्दबध्द केले आहेत अजित कुलकर्णी यांनी...

साथीचे रोग : धुळ्यातील तीन शतकांतील नोंदी (Dhulia History Record of Epidemics)

कोरोनाची साथ ही धुळे जिल्ह्यापुरती तरी इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे! यापूर्वी अठराव्या, एकोणिसाव्या आणि विसाव्या अशा तिन्ही शतकांत साधारण याच वर्षाच्या सुमारास धुळे जिल्ह्यात साथीच्या रोगांचा फैलाव झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
_lamb_tarota_lahan

तरोटा (टाकळा) च्या संकटाचे संधीत रुपांतर! (Casia tora trouble Transforming into opportunity) i

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तरोटा/टाकळा (casia tora) या वनस्पतीने  धुमाकूळ घातला आहे. ती वनस्पती एक प्रकारचे तण (weed) आहे. ती स्थानिकच आहे. ती मध्य भारतात...
_mahakavtichi_bakhar

महिकावतीची बखर (Mahikavati Bakhar)

0
महिकावतीची बखर हे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली. राजवाडे...
-carsole

व्हीकेराजवाडे.कॉम (vkrajwade.com)

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी जमवलेल्या सुमारे एक लाख दुर्मीळ कागदपत्रांचा ठेवा http://vkrajwade.com  ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला गेला आहे. राजवाडे संशोधनमंडळ (धुळे), यशवंतराव...