ठाण्याजवळच्या कळवा गावचे गोपीनाथ पाटील हे ध्येय व ध्यास घेऊन सार्वजनिक जीवनात वावरले. त्यांच्या कार्यासाठी त्यांचे परवलीचे सूत्र होते, सहकार ! तेच कार्यसूत्र, खरे तर, स्वातंत्र्योत्तर काळातील संस्था, उपक्रम यांच्या स्थापनेत होते. गोपीनाथ यांच्यामुळे अनेक उपक्रम स्वतःच्या पायावर कळवा परिसरात भक्कमपणे उभे आहेत. ती त्यांच्या कार्याची पावती होय.
ते ज्या कळवा गावात राहत होते ते गाव ठाणे या शहराला लागून असूनसुद्धा अनेक सुविधांपासून दूर होते. कळवावासीयांना दैनंदिन व्यवहारिक गरजा भागवण्यासाठी ठाण्याची वाट तुडवण्याला पर्याय नव्हता. कळव्यातील ते अंधारयुग नष्ट करण्यासाठी आंतरिक तळमळीने उभे राहिले ते गोपीनाथ पाटील. त्यांच्या सार्वजनिक कार्यातून उभ्या राहिल्या अनेकानेक संस्था. गोपीनाथ पाटील यांनी सामाजिक भान जपताना त्याला व्यावसायिकतेची जोड कशी देता येईल याचाही विचार ठेवला. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था स्वतःच्या पायांवर स्वतंत्रपणे उभ्या आहेत; त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने प्रसिद्धी पावलेल्या आहेत. त्या सगळ्यांवर गोपीनाथ पाटील यांच्या कार्याची, कर्तृत्वाची, शिस्ती
गोपीनाथ पाटील हे शेतकरी कुटुंबातील, त्यांचे शिक्षण कॉमर्सचे पदवीधर-कायद्याची एलएल बी पदवी मिळवलेले असे होते. पाटील यांचे शिक्षणाच्या ओघात वाचनही पक्के झाले होते. गोपीनाथ पाटील हे पक्के वाचक होते. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यास प्रेरक ठरली ती बी.जे. हायस्कूल(ठाणे) ही शाळा. ग्रंथपालाने पहिले पुस्तक त्यांच्या हातात ठेवले ते ‘सिंदबादची सफर’. तेथून त्यांच्या वाचनाची होडी ग्रंथालयाच्या खाडीत वल्हे मारू लागली. पुढे, मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमुळे ती बोट होऊन समुद्रात उतरली. मराठी ग्रंथसंग्रहालय आणि नगरवाचन मंदिर या ठाण्यातील समृद्ध ग्रंथालयांनी तिला हवी असणारी सर्व प्रकारची रसद पुरवली. त्यातून एक गुणी वाचक तयार झाला ! गोपीनाथ यांनी ठाणे कोर्टात वकिली काही काळ केली. ते कळवा गावातील असे शिक्षण आणि व्यवसाय करणारे पहिले पदवीधर होत. वकिली करत असताना येणारे अशील, अनेकदा गरीब आणि गांजलेले असत. गोपीनाथ यांना त्यांच्याकडून फी घेणे अस्वस्थ करणारे ठरू लागले, तेव्हा त्यांनी वकिली करणे सोडून दिले.
राजकारणाशी संबंधित असा मोठा परिवार गोपीनाथ यांच्यासोबत होता. ते गावातील ग्रामपंचायतीचे राजकारण जवळून पाहत होते. एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ पाटील यांची भूमिका कार्यकर्त्याची होती. त्यांचा कल सुरुवातीला काँग्रेस पक्षाकडे होता. आणीबाणीनंतर ठाण्यात जनता पार्टीची स्थापना झाली. त्या पार्टीचे ठाणे तालुका अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. गोपीनाथ पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहवे असे सगळ्यांचे मत होते, पण गोपीनाथ यांनी त्यास नकार दिला. कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या वेळी तर त्यांच्या नावाचा कळवा-बेलापूर पट्ट्यात प्रचारदेखील सुरू केला होता. त्याही वेळी त्यांनी नकार दिला. गौतम पोशा भोईर हे निवडून आले. त्यांच्यामागे प्रचाराची धुरा सांभाळणारे होते गोपीनाथ पाटील. पुढे त्यांचे असेच दिल्लीला जाणे झाले तेव्हा त्यांची आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, मधु दंडवते यांची भेट झाली. त्यांनी सरकारमधील उपक्रमातील जबाबदारीचे पद स्वीकारण्याचे सुचवले तेव्हा गोपीनाथ यांनी ‘मी कार्यकर्ता आहे, तसाच मला राहू द्या’ असे सांगून ते त्यांच्या मताशी ठाम राहिले. काँगेस पुन्हा सत्तेवर आली ती जनता पक्षाच्या विघटनामुळे, तेव्हा गोपीनाथ पाटील राजकारणापासून पूर्णपणे दूर झाले !
मुकुंद, नॅशनल या कंपन्यांत असलेला कामगार असंतोष दूर करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज होती. गोपीनाथ पाटील यांनी तेथे तेथे त्या त्या वेळी पुढाकार घेतला. कामगार व मालक यांच्यात समन्वय साधण्यासाठी मध्यस्थाची भूमिका पार पाडली. मात्र तेथे पैसा खाणे, दलाली असे आरोप त्यांच्यावर होण्याची शंका वाटली तेव्हा ते त्या संघर्षापासून दूर झाले.
ते बांधकाम व्यवसायात उतरले ते स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून नव्हे. त्यापाठीमागे देखील सामाजिक भाव होता. कळवा गावात चाळीवजा जुनी बैठी घरे होती. त्यांतील सुविधा अपुऱ्या होत्या. जागेची कमतरता, वाढती कुटुंबसंख्या आणि बदलते राहणीमान… असे सारे समोर दिसत होते. त्यांतील महत्त्वाचा मुद्दा होता, तो सोबत असलेल्या सहकारी मित्रांचा. ते बँक, सोसायटी, वाचनालय अशा संस्थांच्या स्थापनेत त्यांचे सहकारी होते आणि ते बहुतेक जण तशा घरांमध्ये भाडेकरू म्हणून राहत होते. तेव्हा गोपीनाथ यांनी त्यांच्यासाठी घरे नव्या काळानुसार निर्माण करण्याची गरज आहे हे ओळखून, घरे सहकारी तत्त्वावर बांधण्याचा निर्णय सहकाऱ्यांशी बोलून घेतला. त्या कामातील नियोजन, चोखपणा, योग्य दर, जमीनमालक आणि रहिवासी यांना प्रत्येकाला योग्य न्याय देण्याची भूमिका अशा आचारसंहितेतून कळवा गावात सहकारी गृहनिर्माणाचा प्रकल्प वाजवी खर्चात सिद्ध झाला ! सहकाऱ्यांची सोय झाली. गोपीनाथ पाटील यांचा अनुभव, त्यांच्या चोख कामाची आणि वाजवी किंमतीची खात्री झाली, तेव्हा घरबांधकामाचे दुसरे प्रस्ताव स्वतःहून त्यांच्याकडे येऊ लागले. गोपीनाथ यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळेल याची पुरेपूर दक्षता घेतली. त्यांच्या त्या प्रयत्नांतील नफ्यापेक्षा सहकार आणि सहकार्य हा अस्सल हेतू जाणवून गेला. व्याप विस्तारला तेव्हा गोपीनाथ यांनी रीतसर बांधकाम व्यावसायिक म्हणून कामास सुरुवात केली. त्यांनी ‘रॅपिड कन्स्ट्रक्शन’ नावाची बांधकाम कंपनी स्थापन केली. कळवा परिसरातील अनेक उत्तम इमारती या रॅपिड कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सचोटीची साक्ष देत उभ्या आहेत.
गोपीनाथ पाटील हे स्वतः शिस्तप्रिय. प्रत्येकाने शिस्तीत वागावे ही त्यांची अपेक्षा. सचोटीचा धडा त्यांनी स्वतःच्या आचरणातून घालून दिला. त्यांच्याकडे सहकाराची दृष्टी आहे, तशी माणूस पारखण्याची उत्तम कला आहे. त्यांना सर्व क्षेत्रांत जे यश मिळाले त्याला कारण हे जिवलग सहकारी आणि त्यांच्याशी गोपीनाथ यांनी जोडलेले मित्रत्वाचे नाते. त्यांनी वाटेल त्या प्रसंगी धावून जाण्याची, मदत करण्याची माणुसकी जपली. गोपीनाथ पाटील चोरीलबाडी करणाऱ्याला क्षमा करत नसत. कोठलेही काम असो, कधी आळस नाही, जेवढे झाले तेवढे पुरे झाले अशी संतुष्टता व त्या पोटी येणारा निरुत्साह नाही. सतत पुढे जाण्याचा ध्यास ! त्यामुळे त्यांच्याकडून उभ्या राहिलेल्या सर्व सहकारी संस्था स्वतःच्या पायांवर भक्कमपणे उभ्या आहेत, त्यांच्या कर्तृत्वाने अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या आहेत. प्रत्येक संस्था साक्ष देत आहे ती गोपीनाथ पाटील यांच्या ध्यासाची, कर्तृत्वाची, त्यांच्या सहकार वृत्तीची !
त्याच विविध संस्थांची माहिती :
पारसिक जनता सहकारी बँक
शासनाने कळवा-बेलापूर हा, पारसिक डोंगराला लागून असलेला भाग संपादित करून तो औद्योगिक पट्टा म्हणून जाहीर केला. त्याला जोडून इमारती, शाळा, दवाखाने व इतर उद्योग आले. जमिनी संपादित केल्याने भूमिपुत्रांच्या हाती कधी नव्हे इतका पैसा आला. तो पैसा उधळला जाऊ नये- तो सुरक्षित गुंतवला जावा- उद्याच्या उभ्या राहणाऱ्या उद्योगात भूमिपुत्र सहभागी व्हावा यासाठी त्याला पतपुरवठ्याची गरज लागेल- ती पुरवता यावी… अशा विविध गरजांकरता, आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेची आवश्यकता आहे हा दूरदर्शी विचार गोपीनाथ पाटील यांना एक वेगळीच उभारी देऊन गेला.
गोपीनाथ पाटील यांना कळवा सहकारी सोसायटी या संस्थेचा विस्तार होत असताना बँकेची उणीव भासत होतीच. त्यांना ती उणीव प्रकर्षाने जाणवली ती त्यांनी वारणानगरला भेट दिली तेव्हा. वारणानगरला दूध डेअरीची स्वतःची सहकारी बँक आहे, तिच्यामार्फत सर्व आर्थिक व्यवहार पाहिले जातात, उपक्रम राबवले जातात. ती बँक शेतकऱ्यांसह अन्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम करते. गोपीनाथ पाटील यांनी तशी बँक कळव्यातील नव्या वाढत्या आर्थिक उलाढालीसाठी असावी याविषयी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सल्लामसलत केली. तोपर्यंत दोन संस्था लोकांनी स्वतःच्या पायांवर उभ्या केल्या होत्या. गोपीनाथ पाटील यांनी त्याच जोरावर पुढाकार घेतला. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पत्रके छापली- पावती पुस्तके तयार करून घेतली. पन्नास रुपयाचा एक शेअर ठरला. पावती दिल्याशिवाय पैसे घ्यायचे नाहीत, जमा झालेल्या पैशांचा हिशोब चोख लिहायचा हा कटाक्ष ठरवला. हे सर्व करून गावकऱ्यांची खास सभा घेतली, तीही पंधरा ऑगस्टच्या दिवशी, झेंडावंदन झाल्यानंतर. त्यांनी सभेत सगळ्यांना बँकेची आवश्यकता आणि चोखपणाची हमी समजावून सांगितली. शेअर म्हणजे भागभांडवल. म्हणजे असा शेअर होल्डर बँकेचा मालक असणार आहे. मिळणारा नफा लाभांश म्हणून त्याला मिळेल. कल्पना लोकांना आवडली. बँकेची कल्पना सत्यात उतरली ! कळवा नाक्यावर पटेल इमारतीत भाडे तत्त्वावर दोनशे फूटांची जागा मिळाली. बँकेचे उद्धापारसिक जनता सहकारी बँकटन आरोग्यमंत्री भाऊसाहेब वर्तक आणि प्रभाकर हेगडे यांच्या उपस्थितीत झाले. बँकेचे नाव ठरले ‘’ !
गोपीनाथ पाटील यांनी स्वत: संस्थेचा संस्थापक नव्हे तर पालक म्हणून काम पाहिले. त्यांची स्पष्ट सूचना होती, की कोणी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सभासद होत असेल तर त्यांना परावृत्त करा. अगोदर बँकेसोबत व्यवहार करून आपलेपणा, विश्वास निर्माण करा. कर्जवसुलीत कठोरपणा हवाच, वसुलीला पर्याय नाही, कितीही जवळचा नातेवाईक असला तरी त्यांचे हे धोरण राहिले. बँकेतील तरलता कायम राहील याबाबत कटाक्ष होता. त्यांनी शिक्षण हाच निकष नोकरभरतीत ठेवला. त्यांचा कोणाच्या दबावाला बळी पडणे वा त्यापुढे झुकणे हा स्वभाव नव्हताच. बँकेच्या हिताला सर्वोच्च प्रधान्य, हा त्यांचा निर्धार होता. त्याच्याआड येण्याची परवानगी कोणाला नव्हती. त्यामुळे बँकेच्या व्यवहारात अपप्रवृत्तीचा शिरकाव होऊ शकला नाही. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताला स्वतःच्या कुटुंबाइतके स्थान दिले. त्यांनी मैत्री जपली. पण बँकव्यहारात तिची सावली पडणार नाही याची काळजी घेतली. तरुणांना स्वतःच्या पायांवर उभे केले. नुसता बँक व्यवहार नाही तर सामाजिक भान ठेवून धर्मादाय संस्थांना मदत केली. समाजोपयोगी उत्तम असे उपक्रम राबवले. ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही उक्ती साध्य केली. बँकचा व्यवहार वाढला, ठेवी वाढल्या, कर्मचारी संख्येत वाढ झाली. बँकेच्या अनेक शाखांचे जाळे विणले गेले, अगदी अन्य राज्यांतदेखील. ती मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक म्हणून ओळखली जाते. काही निष्ठावंत सहकारी त्यांच्यासोबत होते- नारायण गावंड, शहाजी भोसले, जयराम पाटील अशी त्यांची नावे. सदैव तत्पर अशी ही मंडळी. ते एकजीव होऊन काम करतात.
वृद्धाश्रम
बँकेत वयस्कर ठेवीदार येत. ते त्यांच्याजवळ पैसा असूनही आपुलकीने सांभाळ करण्यासाठी कोणी नाही-निराधार असल्याच्या भावनेने कुंठीत झालेले भासत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून वेगळाच विषय समोर आला. संवेदनशील भावनाप्रधान असा हा विषय. वृद्ध झालेल्या माणसांची आपलेपणाने सांभाळ करण्याची गरज गोपीनाथ पाटील यांना अस्वस्थ करून गेली. माणसाजवळ नुसता पैसा असून उपयोगाचा नाही, आपुलकीची माणसे त्यापेक्षा अधिक गरजेची आहेत. हे पालकत्व स्वीकारायचे तर वृद्धाश्रम हाच उपाय ठरतो. पारसिक मित्रमंडळात त्याविषयी चर्चा करून वृद्धाश्रम कल्पनेवर शिक्कामोर्तब झाले.
तो आश्रम खानिवली येथील कृषी विद्यालयाच्या मोकळ्या जागेत उभारावा असे ठरले. त्यापूर्वी आजूबाजूला असलेल्या इतर वृद्धाश्रमांचा अभ्यास करण्यात आला. तेथील कामकाजाची, सोयिसुविधांची माहिती घेण्यात आली. त्यापेक्षा उत्तम, प्रत्येकाला स्वतःचे स्वातंत्र्य जपता येईल, जोडपे असेल तर त्यांच्यासाठी वेगळी स्वतंत्र सोय, भरपूर झाडी- बाग- निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येईल असे प्रसन्न वातावरण, खेळ–मनोरंजनाची साधने असे नियोजन पाटील यांनी स्वतःच्या देखरेखीखाली केले. कृषी विद्यालय आणि वृद्धाश्रम यांच्या इमारती उभ्या राहत असताना, सिमेंटची समस्या निर्माण झाली तेव्हा त्यांनी स्वतःच्या बांधकाम व्यवसायातील सिमेंट पाठवून कामे पूर्ण केली !
कृषी विद्यालय
खानिवलीच्या कृषिविद्यालयाची हकिगत थक्क करणारी आहे ! खानिवली हे गाव ठाण्यापासून जवळच शहापूरला लागून आहे. तेथे डोंगराच्या पायथ्याशी गावाच्या शिवारात गोपीनाथ पाटील यांची स्वतःची मोठी शेतजमीन आहे. शेतपिकासाठी नवनवीन प्रयोग करणे ही त्यांची आवड. त्यासाठी ते दापोली कृषी विद्यापीठाशी संपर्क साधत. सगळ्याच शेतकऱ्यांना असा संपर्क करणे शक्य नसते. त्यामुळे प्रयोग करणे शेतकऱ्यांना जमत नाही. अशा ग्रामीण भागातील तरुणांना शेतीविषयीचे शिक्षण जागीच मिळाले तर ते स्वतःची प्रगती करू शकतील, स्वतःच्या पायांवर उभे राहतील. हे लक्षात घेऊन कृषी विद्यालय सुरू करण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाप्रमाणे केंद्र शासनाचीही परवानगी आवश्यक होती. त्याप्रमाणे सगळ्या अटी व नियम यांची पूर्तता करणे अवघड नव्हते. ती जबाबदारी नारायण गावंड या विश्वासू सहकाऱ्याने पार पाडली. पुण्याच्या या क्षेत्रातील श्रीरोज कंपनीची मदत घेतली. आवश्यक असणारी दुमजली भक्कम इमारत उभी केली. तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक केली. दूरच्या विद्यार्थ्यांसाठी होस्टेल आणि भोजनगृह, खेळाचे मैदान, ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्रशस्त वर्ग, पॉलिहाऊस, शेळीपालन व कुक्कटपालन यांची वेगळी व्यवस्था, वाहून जाणाऱ्या पाण्याचा ओढा अडवून तयार केलेला मोठा तलाव अशा तऱ्हेने सुसज्ज तयारी झाली. ‘बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली)’चे अधिकारी ही सुसज्जता पाहून थक्क झाले ! त्यांनीच पाटील यांना विचारले, ‘तुम्ही मान्यतेसाठी केलेला अर्ज कृषी विद्यालयासाठी आहे की कृषी महाविद्यालयासाठी? आताच महाविद्यालयासाठी अर्ज करा.’
पारसिक लोकमित्र मंडळ
गोपीनाथ पाटील यांनी सुरू केलेले विविध उपक्रम हे सहकारी तत्त्वावर आधारित असल्याने त्यांच्या सोबत असलेल्या सहकारी मित्रांची एक फळीच तयार झाली ! पाटील यांनी कोठलीही कल्पना समोर ठेवली, की तिला मूर्तरूप देण्यासाठी ती फळी सदैव तत्पर असे. त्या मित्रांचे एक मंडळ त्यातून साकार झाले. तशा मंडळाची समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी आवश्यकता होतीच. मंडळामार्फत अनेक उपक्रम हाती घेतले गेले. त्यांतील पहिला उपक्रम होता नाईट स्कूलचा. कष्टकरी, गरीब, मुलांना, तरुणां
वृक्षारोपण
गोपीनाथ पाटील यांनी पावसाळ्याच्या दिवसांत त्यांच्या कळवा मध्यवर्ती ग्राहक संस्था आणि पारसिक जनता सहकारी बँक यांतील सहकारी यांच्यासोबत सहल काढली ती पारसिक डोंगरावर. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये सहकाराची, बंधुत्वाची आणि त्यातून एकोप्याची भावना वाढीस लागते हा त्यामागील विचार. दैनंदिन व्यवहारापासून काही काळ दूर गेले तर नवा हुरूप प्राप्त होतोच ! एकदा पारसिक डोंगरावर पावसाळ्यात सहल म्हणून गेले असताना, निदर्शनास आले ते असे, की डोंगर एैसपैस पसरलेला आहे, परंतु त्याचा माथा बोडका आहे. एकही झाड तेथे नाही ! निसर्गाचा हा थंडपणा की मानवाने केलेली कत्तल? उत्तर काहीही असो, तो प्रदेश हिरवागार करायचा, वृक्षारोपणाद्वारे डोंगराच्या माथ्यावर हिरवा मुकुट परिधान झाला पाहिजे, हा संकल्प गोपीनाथ पाटील यांचा तेथेच मनोमन झाला. तेच त्या सहलीचे फलित !
काम सोपे नव्हते. डोंगर उंच आणि चढणीला अवघड. पायवाट तयार करणे, कुदळ–फावडे–माती–रोपे घेऊन वर जाणे, खड्डे करणे– त्यात माती भरणे, पाणी देण्यासाठी ती सोय पाहणे अशी कामांची यादी डोंगराच्या उंचीसारखी समोर दिसत होती ! परंतु गोपीनाथ पाटील यांनी त्यांचे सर्व मित्र, सहकारी यांच्या मदतीने ते वृक्षारोपणाचे आणि पर्यायाने पर्यावरणाचे ते काम हाती घेतले. सहकाऱ्यांमध्ये जिद्द आणि स्फूर्तीचे स्फुल्लिंग फुलवले. दर रविवारी सहल पारसिकच्या डोंगरावर जाऊ लागली. अवघड वाटणारी कामे आकार घेऊ लागली. अंगमेहनत बरीच झाली. सहकाऱ्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवावे लागले. स्वतः गोपीनाथ पाटील त्यात सहभागी होत, काम करत. आंबा, चिंच, आकेशी, सुबाभूळ, करं
गोपीनाथ पाटील यांच्या त्या कामात वनखाते, पर्यावरणवादी यांनीही सहकार्याची भूमिका ठेवली. शहरात अनेक ठिकाणी अशी निसर्गबेटे तयार करण्याची, त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पाटील यांनी पाठोपाठ स्वीकारली. त्यांनी बँकेमार्फत ती पूर्ण करण्यात पुढाकार घेतला.
जवाहर वाचनालय
गोपीनाथ पाटील यांना ओढ होती ती त्यांच्या गावात वाचनालय हवे, याची. ते स्वत: उत्तम वाचक होते. त्यातून उभे राहिले ते ‘जवाहर वाचनालय’ ! ते ग्रामपंचायतीच्या एका लहानशा कोनाड्यात सुरू झाले. पुढे ते स्वतःच्या जागेवर उभे राहिले, तेही दुमजली ! त्यासाठी गोपीनाथ यांनी दत्तात्रय कुळकर्णी नावाच्या मामलेदारांकडून शासकीय भूखंड मिळवला, तोही मोफत, समुद्राच्या काठावर मोती सापडल्यासारखा. त्यांनी गावात चक्क घरोघर जाऊन, वर्गणी जमा करून बांधकाम पूर्ण केले. पुस्तके, कपाटे, फर्निचर मिळवले. त्यामुळे वाचनाची स्वतंत्र सोय झाली. त्याच वेळी मुलांच्या अभ्यासासाठी चोवीस तास उघडी राहील अशी अभ्यासिका सुरू केली. ती संस्था सगळ्यांचे सहकार्य घेऊन 1964-65 च्या काळात उभी राहिली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले होते. पाटील यांनी त्यांचेच नाव संस्थेला देण्याचे औचित्य दाखवले. म्हणून ते झाले ‘जवाहर वाचनालय’. वाचन, अभ्यास, संस्कार आणि मनोरंजनाचे केंद्र म्हणून कळव्यात ओळखले जाणारे पहिले ‘अ’ वर्ग वाचनालय !
कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था
दुष्काळ, चीनचे युद्ध यांचा परिणाम म्हणून अन्न तुटवडा आणि त्यावरील उपाय म्हणजे रेशनिंगची दुकाने ! ही परिस्थिती 1962 सालानंतरची होती. कळव्यात रेशनिंगचे दुकान ग्रामपंचायतीमार्फत चालवले जात होते. गोपीनाथ तेथील हिशेब तपासण्यासाठी जात, त्यात अनियमितता आढळली. त्या व्यवहारात किती चोखपणा असण्यास हवा, हे गोपीनाथ यांनी सोदाहरण दाखवून दिले. पुढे, त्याच दुकानाचे सोसायटीत रूपांतर झाले ! तिच्या चेअरमनपदी गोपीनाथ पाटील आले.
कळवे गावात किराणा दुकाने वीस होती. परंतु त्यांचे मालक स्थानिक नाहीत. ते मालकलोक रास्त भावापेक्षा अधिक नफा घेऊन स्थानिकांची पिळवणूक करत आहेत हे गोपीनाथ यांच्या लक्षात आले. त्यांनी रास्त भाव, उत्तम दर्जा आणि चोख वजन या तत्त्वाने माल खरेदी केला आणि तो नाममात्र नफा ठेवून ग्राहकांना विकला तर त्यात ग्राहकांचा फायदा होईल, हे लक्षात घेऊन सोसायटीच्या कामात तसा चोखपणा आणला. धान्यासोबत ग्राहकांना उपयुक्त ठरतील अशा वस्तू सोसायटीत ठेवण्याची सोय केली. एकाच छताखाली वाजवी भावात उत्तम दर्ज्याचा माल मिळत आहे, हे पाहून ग्राहकांची पावले सोसायटीकडे वळू लागली.
गोपीनाथ यांनी सभासद वाढवून ती संस्था त्यांची आहे ही भावना त्यांच्यात निर्माण करावी अशी संकल्पना त्यांच्या सहकाऱ्यांत रुजवली. नुसता आगरी, कोळी समाज नव्हे तर कळव्यात नवीन वस्तीला आलेला सर्व स्तरांतील समाज, सोसायटीचा सभासद झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. प्रत्येकी दहा रुपयांचा एक शेअर याप्रमाणे दारोदार जाऊन सभासद केले. ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी विविध आकर्षक योजना आखल्या. आवश्यक वस्तू भाड्याने मिळवून देण्याची सोय केली. व्यवहार पारदर्शी राहतील याची काळजी घेतली. त्यामुळे सोसायटीला ग्राहकांची पसंती मिळाली. संस्थेच्या कारभारात वाढ झाली. तिचा विस्तार करण्याची वेळ आली; अनेक शाखा काढणे भाग पडले. मेडिकल स्टोअर, मिनी भांडार सुरू झाले. उलाढाल वाढली. त्यातून मोठा रोजगार निर्माण झाला.
गोपीनाथ पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सहकाराची कल्पना व तिचे पैलू समजावून घेण्यासाठी कोल्हापूर येथील वारणा शेतकी सहकारी संघ आणि इतर सहकारी संस्था यांना भेटी दिल्या. तेथील सहकार जाणून घेतला. ठाण्यातील समर्थ भांडार यांचेही सहकार्य घेतले. त्या सगळ्या धडपडीतून साकारलेली, कळवा-दिघा-खारीगाव या परिसरात शाखांच्या स्वरूपात विस्तार पावलेली, ग्राहकाला स्वत:ची वाटत असलेली संस्था म्हणजे ‘कळवा मध्यवर्ती ग्राहक संस्था’, ती ‘सहकार बझार’ या नावाने जनमानसात रुजली आहे. कळव्यात तिचे मुख्य कार्यालय आणि भांडार अशी स्वतःची मोठी वास्तू आहे. संस्थेने सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. या संस्थेला शासनाने ‘सहकार भूषण 2013’ हा पुरस्कार देऊन तिच्या कार्याचा गौरव केला आहे.
– चांगदेव काळे 9869207403 changdeokale@