साने गुरुजी संकेतस्थळाचे लोकार्पण

महाराष्ट्रात जन्माला आलेल्या असामान्य व्यक्तींचे कार्य आजच्या पिढीसमोर सतत राहायला हवे या उद्देशाने ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ने त्यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती देणारी सविस्तर ‘संकेतस्थळे’ तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. संकेतस्थळावर या व्यक्तींचे चरित्र, विचारधारणा, कार्य, दुर्मिळ दस्तावेज, फोटो इत्यादी साहित्य संग्रहित केले जाईल. अशा तीनशेहून अधिक असामान्य व्यक्तींची यादी करण्यात आली आहे. ज्या मुख्य संकेतस्थळावर प्रत्येक व्यक्तीविषयीच्या लिंक उपलब्ध असतील त्या संकेतस्थळाला ‘महाभूषण’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ म्हणून साने गुरुजींवरील संकेतस्थळाचे लोकार्पण आज होत आहे. वाचक www.mahabhushan.com याद्वारे संकेतस्थळाला भेट देऊ शकतील...

थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन

लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले...

निसर्गसंरक्षण : लोकसहभागातून की जुलूम-जबरदस्तीने? – व्याख्यान

‘निसर्गसंरक्षण : लोकसहभागातून की जुलूम-जबरदस्तीने?’ या विषयावर ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मभूषण माधव गाडगीळ यांचे ऑन लाइन व्याख्यान ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर झाले. ते युट्युबवर उपलब्ध आहे. त्यामध्ये त्यांची मुख्य मांडणी अशी होती, की वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली वनविभागाला अमर्याद अधिकार देऊन, वनालगत राहणाऱ्या लोकांवर निसर्गसंरक्षण लादण्यापेक्षा, ग्रामसभांना अधिकार देऊन त्यांच्यावर निसर्गसंरक्षणाची जबाबदारी सोपवावी...