सौंदर्यशास्त्र गणिताचे (Aesthetics of Mathematics)

16
गणित हा शास्त्रीय संगीताइतकाच सौंदर्यपूर्ण आणि अभिजात विषय आहे. ज्याला प्युअर मॅथेमॅटिक्स म्हणजेच विशुद्ध गणित म्हणतात ते म्हणजे मानवी प्रतिभेच्या शिखरांपैकी एक आहे. मात्र शालेय जीवनापासून चुकीच्या पद्धतीने शिकवल्यामुळे म्हणा किंवा शिकल्यामुळे म्हणा; अनेक बुद्धीमान माणसे या बौद्धिक पोषणाला मुकतात. या अवघड वाटणाऱ्या विषयाबद्दल ‘सौंदर्यशास्त्र गणिताचे’ या लेखात सोप्या भाषेत सांगत आहेत, गोव्याचे गणित शिक्षक मुकेश थळी...

मंगल मैत्री : एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या जन्माची गोष्ट

1
विख्यात गणितज्ज्ञ डॉ. मंगल जयंत नारळीकर यांचे 17 जुलै 2023 रोजी निधन झाले. त्यांच्याविषयीच्या माहितीची नोंद व्हावी या उद्देशाने डॉ. शुभा थत्ते यांच्यासह डॉ. मंगला नारळीकर यांच्या सहा मैत्रिणींनी त्यांच्या आठवणींचे एक पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. ‘मंगलमैत्री’ नावाचे हे पुस्तक डॉ. शुभा थत्ते यांनी संपादित केले आहे. त्या या लेखात पुस्तकाच्या जन्माविषयी सांगत आहेत. जेणेकरून वाचकांना डॉ. मंगला नारळीकर यांचा परिचय होईल आणि पुस्तक वाचावेसे वाटेल...

गणितीय कूट रचनेचे मर्म (Concept of Mathematical Coherence)

1
शास्त्रीय संगीताविषयी आणि गणिताविषयी मालिका सुरू करण्याचे उद्दिष्ट हे आहे की काही अमूर्त सौंदर्य कल्पनांपर्यंत पोचण्याचा मार्ग सुकर व्हावा. सर्वसामान्यपणे शास्त्रीय संगीताप्रमाणेच गणिताविषयी मनात एक सूक्ष्म अढी असते पण दोन्ही समजल्यावर आंनंद होतो. गणिताविषयीच्या मालिकेत काही संकल्पना आणि काही कोडी अशी जाणीवपूर्वक रचना केली आहे जेणेकरून वाचायलाही गंमत येईल...
_Kaprekar_1.jpg

गणितानंद – दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर (Marathi Mathematician – Dattatreya Ramchandra Kaprekar)

द. रा. कापरेकर हे श्रीनिवास रामानुजन् यांच्यानंतरचे जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ. ते मराठी आहेत याचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1905 ला...
carasole

ओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ

11
प्लेगचे कारण घेऊन पुण्याच्या कमिशनरांनी काही पाचपोच न ठेवता लोकांच्या घरात शिरून लोकांचा छळ आरंभला होता तेव्हा "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा अग्रलेख...
_vidnyanveda_pujari

कराडचा विज्ञानवेडा ‘पुजारी’

2
यशवंतराव चव्हाण यांचा कराडमधील ‘विरंगुळा’ बंगला हे तीर्थस्थान बनून गेले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना व त्याचा विकास यांसाठी केलेले कार्य स्मरून लोक ‘विरंगुळा’...

डॉ. विजय भटकर

न्यूयार्क येथील वॉल स्ट्रीट जर्नलच्या पहिल्या पानावर 24 मार्च 1993 रोजी 'इंडिया डीड इट' या शीर्षकाखाली एक बातमी आली होती. त्या बातमीच्या केंद्रस्थानी होते...
-gif-heading

जीआयएफनी गणित झाले सोपे

7
गणिताशी गट्टी असलेला विद्यार्थी तसा विरळाच; अनेकांसाठी तर अभ्यासातील मोठा शत्रू म्हणजे गणित असतो. अनेकांचे शिक्षण थांबते, ते केवळ गणिताशी असलेल्या कट्टीमुळे. शमशूद्दिन अत्तारसरांनी...
_Adhyatma_EkParmanand_1.jpg

अध्यापन – एक परमानंद

मी माझ्या लहानपणी आजोबांबरोबर ओसरीवर बसून पावकी, निमकी, दिडकी वगैरेंबरोबर एक ते तीस पाढे रोज संध्याकाळी म्हणायचो. बरेचसे पाढे मला तोंडपाठ आहेत. बरेचसे म्हणायचे...

प्रांजलाच्या शिक्षणाची सुरुवात

प्रांजलाची आई परिस्थितीने त्रस्त अवस्थेत माझ्याकडे आली. प्रांजला ही इयत्ता दुसरीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील विद्यार्थिनी. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर. त्या चालू वर्षाच्या अभ्यासाचा मोठा बोजा...