दुर्गा खोटे : सहा दशकांचा अभिनयप्रवास
दुर्गा खोटे यांच्यावरील स्वतंत्र वेबसाइटचे प्रकाशन ‘महाभूषण वेबसाइट’ मालिकेत अलिकडेच ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे करण्यात आले. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील आद्य अभिनेत्रींपैकी एक. त्यांनी मूकपटांपासून बोलपटांपर्यंत सहा दशकांचा अभिनयप्रवास गाजवला. त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ मधील तारामतीपासून ‘मुघल-ए-आझम’ मधील जोधाबाईपर्यंत अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांनी स्त्रियांसाठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले केले. त्यांनी मराठी रंगभूमी, माहितीपट, दूरदर्शन निर्मिती आणि आत्मचरित्र लेखन अशा विविध क्षेत्रांतही ठसा उमटवला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमधील सहभाग हे त्यांच्या गौरवाचे शिखर. दुर्गा खोटे म्हणजे दृढनिश्चय, कलात्मकता आणि सामाजिक परिवर्तनाचा साक्षात इतिहास...
हेमा साने – निसर्गाशी एकरूप झालेले जीवन
ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांची वनस्पती क्षेत्राच्या एनसायक्लोपिडिया अशी ओळख होती. त्यांनी आयुष्यभर निसर्गाशी एकरून होऊन राहण्याची जीवनशैली सांभाळली. त्यांनी पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी राहूनही शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. त्यांनी मनुष्य विजेशिवायही राहू शकतो, हे स्वतःच्या जगण्यातून लोकांना दाखवून दिले. त्यांनी दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तके लिहिली...
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिसरकार ! (Revolutionary Nana Patil’s parallel government)
साताऱ्याचे नाना पाटील यांचे नाव ‘प्रति सरकार’ वा ‘पत्री सरकार’ या नावाशी जोडले जाते. म्हणून तर त्यांना क्रांतिसिंह म्हणतात. ते स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते होत. त्यांनी भूमिगत राहून ‘प्रतिसरकार’ उभारले. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हे, तर सामाजिक समता, न्याय यांसाठी आणि आर्थिक शोषणांविरुद्ध लढा दिला. त्यांना जनतेने घडवले आणि उलट, त्यांनी जनतेला संघटित करून इतिहास घडवला ! महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतील त्यांच्या पुढील काळातील एक महत्त्वाची कडी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ते महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनावर 1928 ते 1976 या काळात प्रभाव टाकणारे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते...
आधी विकास मग पुरस्कार – गोविंदभाई श्रॉफ (Govindbhai’s conditional acceptance of Padmavibhushan)
गोविंदभाई श्रॉफ यांच्यावरील महाभूषण वेबसाइट सर्वांसाठी खुली झाली आहे. त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे, तर मराठवाड्यातील जनतेच्या स्मृतिपटलावरही पुसट झाले आहे. परंतु गोविंदभाईंनी 1938 ते 2002 या दीर्घकाळात हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यपूर्व राजकारणावर आणि स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याच्या विकासावर त्यांचा अमीट ठसा उमटवला ! माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि गोविंदभाई यांचा उत्तम स्नेह होता. त्यांच्या संबंधातील एक किस्सा वेबसाइटवर नमूद आहे...
गोविंदभाई श्रॉफ यांच्यावर संकेतस्थळ (Website On Govindbhai Shroff)
स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा परिचय करून देणारे संकेतस्थळ गुरूवार, 24 जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने तयार करण्यात आले आहे. वेबसाइटचे लेखन गिरीश घाटे यांनी केले आहे. जन्मशताब्दीवीरांच्या वेबसाईट्स या प्रकल्पाचे नाव ‘महाभूषण’ संकेतस्थळे असे आहे. त्या मालिकेतील हे आठवे संकेतस्थळ आहे. गोविंदभाई श्रॉफ यांचा स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत म्हणून लौकिक होता. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांची 24 जुलै ही एकशेचौदावी जयंती...
उद्योजकतेचा आदर्श: आबासाहेब गरवारे यांचे डिजिटल चरित्र
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या जन्मशताब्दीवीरांच्या ‘महाभूषण’ प्रकल्पात साकारलेले आबासाहेब गरवारे यांच्यावरील संकेतस्थळ, एका उद्योजकाच्या जीवनाची, त्यांच्या संघर्षाची, यशाची आणि त्यांनी देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची समग्र माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. हे त्यांचे केवळ चरित्र नाही, तर तत्कालीन औद्योगिक भारताचा इतिहास आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारे विचार यांचा ठेवा आहे. हे संकेतस्थळ आबासाहेबांसारख्या व्यक्तीच्या स्मृतीला आणि त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन ठरेल...
भारतरत्न नानाजी देशमुख यांच्यावर संकेतस्थळ (Bharatratna Nanaji Deshmukh Website)
समाजकार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे संकेतस्थळ मंगळवारी, ८ जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने जन्मशताब्दीवीरांच्या प्रकल्पांतर्गत तयार केले आहे. वेबसाइटचे लेखन ललिता घोटीकर यांनी केले आहे आणि संपादन गिरीश घाटे यांनी. नानाजी देशमुख यांचे मूळ नाव चंडिकादास अमृतराव देशमुख. त्यांचा सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून मोठा लौकिक होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या तीन क्षेत्रांत मुख्यत: काम केले...
ना.ग. गोरे : राजकारण आणि साहित्य
नारायण गणेश गोरे हे नानासाहेब गोरे म्हणून ओळखले जातात. ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील बहुमोल व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला आहे. त्यांची निष्ठा समाजवादी विचारधारेशी कायम राहिली. समाजात समता, न्याय आणि बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य झोकून दिले. नानासाहेबांचे विचार आणि कार्य हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या प्रक्रियेत मोलाचे मानले जातात...
शंकर पळशीकर: एक चिंतनशील कलावंत
शंकर बळवंत पळशीकर हे चित्रकार तर होतेच; त्याबरोबर ते उत्तम शिक्षक आणि प्रतिभावान कलासमीक्षकही होते. त्यांनी उत्तमोत्तम चित्रे निर्माण केली आणि कलेद्वारे कलाप्रेमींसमोर आत्मपरीक्षणात्मक विचार मांडले. त्यांच्या कलासाधनेतून आणि विचारांतून अंतर्मुख, चिंतनशील असा कलाविचार रसिकांसमोर येतो. पळशीकर यांची चित्रे ही दृश्य सौंदर्याच्या पलीकडे जातात. त्यांच्या चित्रांतून वैचारिक संवाद निर्माण होतो. त्यामध्ये पारंपरिक भारतीय रंगछटा, मध्यकालीन भित्तिचित्रांचे प्रभाव आणि आधुनिक कला यांचा संगम दिसतो. त्यांनी अमूर्त चित्रकला स्वीकारली, पण ती केवळ तांत्रिक नव्हती- त्यात जीवन, मन आणि अस्तित्व यांचा खोल शोध होता. त्यांची चित्रे गूढ शांतता प्रस्थापित करतात आणि कलाप्रेमींना विचार करण्यास लावतात...
विनोबांच्या मानसकन्या: कालिंदी सरवटे
कालिंदी सरवटे यांचा मृत्यू 7 एप्रिल 2025 च्या रात्री झाला. त्या विनोबांच्या मानसकन्या. त्यांचे निधन वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी झाले. त्या विनोबा भावे यांच्या अनुयायी, भूदान चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या, लेखिका होत्या. त्या त्यांचे आयुष्य विनोबामय जगल्या. त्या विनोबांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांच्याशी वयाच्या बावीस-तेविसाव्या वर्षी जोडल्या गेल्या. त्यांना सारा विनोबा परिवार ‘कालिंदीताई’ म्हणत असे. विनोबांचा विचारवसा तब्बल सात दशके कालिंदीताई जोपासत होत्या...