गिरवीचा गोपालकृष्ण (Giravi’s Gopalkrishna Temple)
गिरवी येथे असलेल्या गोपालकृष्ण मंदिरातील कृष्णाची मूर्ती सुंदर तर आहेच; परंतु तिच्या पाठीमागे, म्हणजे ती मूर्ती तयार व स्थापन होण्यामागे एक कथा आहे, तीही रोचक आहे. मूर्ती धेनुसहित श्रीकृष्णाची आहे. मंदिराभोवती दगडी चुनेगच्ची तट आहे. त्या सभोवतालच्या ओवऱ्यांवर मात्र आदिलशाही वास्तुरचनेची छाप आहे. गिरवी हे गाव फलटणपासून दक्षिणेला बारा किलोमीटरवर आहे...
वडखळ… एक हरवलेला थांबा ! (Wadkhal lost its significance in Mumbai-Goa road development)
वडखळचा थांबा ! ज्यांनी म्हणून मुंबईतून कोकणात किंवा अलिबागला प्रवास केला आहे, त्यांचा त्या गावाशी नक्की परिचय असेल. पेण या महत्त्वाच्या एसटी स्टँडपासून सात-आठ किलोमीटरवर असलेले ते गाव एरवी दुर्लक्षित राहिले असते, पण मुंबई-गोवा महामार्गाने त्या गावाला ओळख दिली. कोकणात जाणारी गाडी मुंबईतील वाहतूक कोंडी फोडून पनवेल ओलांडते, पळस्प्याला लागते आणि मग जरा एका लयीत येते. वाहतूक कोंडीत गचके खाणारे प्रवासी गार हवा आल्याने सुस्तावतात, ते पेणचा स्टँड येईपर्यंत...
पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ – कोकणातील पहिली (Palshet’s Paleolithic cave – first in Konkan)
रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील सुसरोंडी-पालशेतची ‘पुराश्मयुगकालीन गुहा’ हे आश्चर्यच ठरले आहे ! तिचा शोध पुण्याच्या डेक्कन पोस्ट ग्रज्युएट रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. अशोक मराठे यांनी 2001 साली लावला. ती किमान नव्वद हजार वर्षे जुनी असावी. भारताच्या साडेसात हजार किलोमीटर लांब समुद्र किनाऱ्यावरील ती पहिली गुहा आहे. ती मानवनिर्मित गुहा आहे...
हॉटेल ‘करी लिव्हज’ची गोष्ट ( Story of Hotel Curry Lives)
‘अंडा रोल’, ‘चिकन रोल’ यांच्या हातगाड्या नासिक शहरात ठिकठिकाणी उभ्या असतात. तशी पहिली गाडी सोळा वर्षांपूर्वी कॉलेज रोडला सुरू झाली. हातगाडीवर ‘अंडा रोल’ विकण्यास...
‘नॉ लिंग’ : रेवदंडा गावाजवळ सापडले दुर्मीळ भाषेचे धन
कोरलई हे रायगड जिल्ह्यातील रेवदंड्याच्या खाडीच्या पलीकडे असणारे छोटेसे गाव. ते अलिबागपासून बावीस किलोमीटरवर आहे. ते रेवदंड्याच्या खाडीत घुसलेल्या भूभागावर वसलेले आहे. कोकण किनारपट्टीवर...
मराठवाड्यातील पुरातन – श्री सिंदुरात्मक गणेश
सिंधुरासुराचे मंदिर शेंदुरवादा या गावी (तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) आहे. सिंधुरासुराचा वध व गणेशाचे स्वतःचे वाहन मूषक/उंदीर यास दिलेली मुक्ती या दोन प्रमुख पौराणिक...
तेरचा प्राचीन वारसा
तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते...
गड-किल्ल्यांचे जलव्यवस्थापन
गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य (छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे - “... तसेच गडावरी आधी उदक पाहून...
चंद्रपूरचे अधिपती धारचे परमार
उपेंद्र हा परमार वंशातील पहिला ज्ञानपुरूष मानला जातो. परमार वंशाचे इसवी सन 1950 नंतरचे अभिलेख आहेत त्यात त्याची कथा दिलेली आहे. भगवान रामाचे गुरू...
मेणवलीतील घंटेचे देऊळ
मेणवली हे वाईपासून तीन किलोमीटरवर असलेले कृष्णा नदीकाठचे लहानसे गाव. त्याची ओळख नाना फडणवीस यांचे गाव अशी आहे. औंधचे भवानराव त्रंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे...