सातपुड्यातील लोकउत्सव – बहिरम यात्रा
बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी व मराठी भाषिक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे ! यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवर भरते. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेचा लौकिक सर्वदूर आहे. यात्रेला पौराणिक महात्म्य आहे. बहिरम (भैरवनाथ) हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनासोबत अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्य संस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशी सर्व गोष्टींची रेलचेल राहते...
दुगावची पीराची यात्रा – हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या पूर्वेस बारा किलोमीटर अंतरावरील चांदवड-मनमाड मार्गावर ‘दुगाव’ नावाचे गाव आहे. गावाची लोकवस्ती पाच हजार. गावात हिंदु, मुस्लीम आणि इतर समाजाचे...
हिंदु-मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान…साध्वी बन्नोमाँ
बोधेगावातील ‘बानुबाई’ नामक आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत अशी एक मुस्लिम स्त्री म्हणजेच बन्नोमाँ. त्या शिर्डीचे साईबाबा यांच्या समकालीन असून आध्यात्मिक व योगशक्तीच्या धनी होत्या. बन्नोमाँ देवी बोधेगावचे ग्रामदैवत आहे...
कोकणातील नवान्न पौर्णिमा
कोकणात घराघरातून साजरा होणारा एक सण म्हणजे ‘नवान्न पौर्णिमा’. नव्याची पौर्णिमा. ‘नवान्न’ म्हणजे नवीन अन्न. त्या दिवसाला नावाप्रमाणेच महत्त्व आहे. नवान्न म्हणजे नवीन तयार...
श्रीदेव केदारलिंग : पाचलचे ग्रामदैवत
केदारलिंग हे पाचलचे ग्रामदैवत. पाचल हे कोकणच्या राजापूर तालुक्यातील गाव. केदारलिंग मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. पाचल गाव कोंड-दिवाळवाडी रस्त्यावर येते. मंदिर रस्त्यालगत दाट वनराईत वसलेले असे आहे -लाकडी, कौलारू आणि टुमदार. मंदिराच्या डाव्या बाजूला ‘ब्राह्मण देवराई’ आणि मागील बाजूला ‘रामेश्वर देवराई’ आहेत. केदारलिंग हे शंकराचे देवस्थान. पण त्या देवळात गाभारा किंवा पिंडी नाही. देवळाला कळस नाही. देवळात पुरातन पाषाणमूर्ती विराजमान आहे. आसनस्थ पाषाण मध्यभागी; केदारलिंग देवाच्या उजव्या बाजूला धनीणबाय, रामेश्वर, कालकादेवी, पावणादेवी, देवाच्या डाव्या बाजूला नवशादेव, ब्राह्मणदेव, ईठलादेवी, नवलादेवी आणि समोर खाली गणपती...
हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक – साध्वी बन्नोमाँ जत्रा
बोधेगाव येथे भरणारी साध्वी बन्नोमाँ जत्रा हिंदु-मुस्लिम लोक एकत्र येऊन साजरी करतात. दोन्ही समुदायांचे ते श्रद्धास्थान आहे. ती जत्रा १८९८ सालापासून नियमितपणे भरत आहे. अठरापगड जातीच्या लोकांमुळे अनेक प्रकारचे वैविध्य त्या एकाच जत्रेत एकवटलेले आढळते...
श्री क्षेत्र कावनाई
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो.
कावनाई हे ठिकाण...
वणी येथील सप्तशृंगी देवी (Saptashrungi Devi)
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या ‘वणी’ या गावाजवळील सप्तशृंगगडावरील देवीचे स्थान हे आदिशक्तीचे मूळ स्थान असून ते साडेतीन पीठांतील अर्धपीठ आहे असे म्हटले आहे.
एकपीठ ते तुळजापूर...
बहिरम – व्यापाऱ्यांची जत्रा (Bahiram Festival – Different Perspective)
बहिरम यात्रेला विदर्भात मोठे ऐतिहासिक स्थान आहे. ते बैतुल-होशंगाबाद या जुन्या राजमार्गावर येते. तेथील यात्रेचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे येतो. कॅप्टन मेडोज टेलरच्या ‘कन्फेशन ऑफ ए ठग’ या पुस्तकामध्ये त्याचे काही संदर्भ सापडतात. बहिरमचे दगडी मंदिर, त्याशी जोडलेली मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांची नावे हे सारे भारतीय संस्कृतीचा वेगळ्याच दृष्टीने विचार आणि तत्संबंधी संशोधन करण्यास भाग पाडते...
श्रीक्षेत्र गाणगापूर (Ganagapur)
श्रीक्षेत्र गाणगापूर हे तीर्थस्थान गुलबर्ग्यापासून पश्चिमेला चाळीस किलोमीटरवर आहे. ते क्षेत्र भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर आहे. तेथे यात्रेकरूंची स्नान करण्याकरता गर्दी होते....