लवथवती

‘लवथवती’ हा शब्द ‘लवथवणे’ या क्रियापदापासून तयार झालेला आहे. काही काही शब्दांना त्यांची स्वतःची लय असते. सळसळ, झुळझुळ, थुईथुई असे शब्द नुसते वाचले गेले तरी ती लय जाणवते. ‘लवथवती’ हा शब्ददेखील तसाच. शंकराच्या आरतीत तो येतो. शंकराच्या आरतीची सुरुवातच मुळी ‘लवथवती’ने होते...

शेपटावर निभावलं

एखादी व्यक्ती जर आश्चर्यकारक रीत्या फार मोठ्या अपघातात किरकोळ दुखापत होऊन वाचली तर त्या वेळी ‘जिवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असे म्हटले जाते. हा वाक्प्रचार शारीरिक संकटाच्या प्रसंगातच दर वेळी वापरला जातो असे नाही...

केळवण

मराठी घरात लग्न किंवा मुंज यांसारखे मंगल कार्य ठरले, की लगेच केळवणाची आमंत्रणे येण्यास सुरुवात होते. केळवण हा लग्न, मुंज यांसारख्या मंगलकार्यापूर्वी होणारा समारंभ आहे. त्यामध्ये वधू आणि वर यांच्या स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे थाटाने मेजवानी करून नातेवाईकांना जेवायला घातले जाते. तसेच, नातलगही त्यांच्या त्यांच्या घरी वधूला किंवा वराला मेजवानी देतात आणि भोजनोत्तर घरचा अहेरही देतात. त्याला यजमानांनी केळवण केले असे म्हटले जाते...

औट म्हणजे साडेतीन

‘औट घटकेचं राज्य’ किंवा ‘औट घटकेचा राजा’ असे शब्दप्रयोग मराठीत आहेत. त्याचा अर्थ अल्प काळाचे राज्य आणि अल्प काळाचा राजा असा होतो. एक घटका म्हणजे चोवीस मिनिटे. औट घटका किंवा साडेतीन घटका म्हणजे चौऱ्याऐंशी मिनिटे. त्यामुळे एखादे सरकार वर्षा-दीड ‘औट’ म्हणजे साडेतीन. ‘इन मीन साडेतीन’मधील साडेतीन. ‘औट घटकेचे राज्य’ किंवा ‘औट घटकेचा राजा’ असे शब्दप्रयोग केले जातात...
carasole

नक्राश्रू ढाळणे

खोटा कळवळा येऊन दुःख झाल्याचे जे प्रदर्शन केले जाते, जो अश्रुपात केला जातो त्याला नक्राश्रू ढाळणे असे म्हणतात. नक्र म्हणजे सुसर. नक्राश्रू म्हणजे सुसरीची आसवे....
carasole

चकाणा!

एखाद्या व्यक्तिच्या एका डोळ्यात व्यंग असेल, त्याचा एक डोळा सरळ बघताना बाहेरच्या बाजूला कानाकडे वळत असेल तर त्याला ‘काणा’ किंवा ‘चकणा’ असे म्हणतात. त्याला...
carasole

क्रीडामृग

‘मृग’ या शब्दाचा हरीण हा अर्थ सर्वांच्या परिचयाचा आहे. ‘हरीण’ या अर्थाने मृग शब्दापासून अनेक शब्द तयार झाले आहेत. जसे, सीतेला ज्या हरणाची भुरळ...
carasole

अरुंधतीदर्शन न्याय

वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती ही पातिव्रत्याचा आदर्श समजली जाते. विवाहप्रसंगी वर वधूला ‘अरुंधती सारखी हो’ असे सांगतो. आकाशातील सप्तर्षींच्या ताऱ्यांबरोबर अरुंधतीलाही स्थान देण्यात आले...
carasole

ख आणि सुख-दुःख

‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख या शब्दाचा अर्थ आकाशा! विश्व हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि...
carasole

घट्टकुटी प्रभात न्याय

संस्कृतमध्ये जे अनेक मजेशीर 'न्याय' आहेत त्यातलाच एक म्हणजे घट्टकुटी प्रभात न्याय. हे नाव ऐकून ‘ह्यात मजेशीर ते काय ?’ असा प्रश्न काहींना पडेल....