‘फालतू’ हा मराठी भाषेत रोजच्या वापरातील शब्द आहे. तो ‘आजचा चित्रपट अगदीच फालतू होता’, ‘फालतू गप्पा मारू नको’, ‘अमूल्य वेळ फालतू गोष्टीत वाया घालवू नका’, ‘माझ्याशी फालतुपणा करू नको’ अशा अनेक वाक्यांतून नेहमी कानी पडत असतो. जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती त्याचा वापर करत असते. ‘फालतू’ या शब्दाचे वाईट, बेकार, निरर्थक, वाह्यातपणा, चिल्लर, क्षुद्र, हलक्या प्रतीचे असे काही अर्थ होतात...