वसुबारस (Vasubaras)

वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

आमच्या कोपरगावची दिवाळी (Diwali At Kopargaon)

कोपरगाव हा प्रगत शेतीने संपन्न अहमदनगर जिल्ह्यातील तालुका. तेथील अर्थकारण शेती - विशेषतः ऊसाची शेती, साखर कारखाने आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक व राजकीय संस्थांशी निगडित आहे.

पौर्णिमेपर्यंत सण (Diwali At Latur)

या ओळी आठवतात आणि दिवाळीच्या आठवणी मनाला प्रसन्न करून जातात. सगळ्या सणांमध्ये आतुरतेने वाट पाहण्यास लावणारा, उत्साह वाढवणारा दिव्यांचा हा सण. मराठवाड्यात दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे.

दिवाळीनिमित्त लेखनाचे आवाहन (Appeal to Write About Diwali)

2
दिवाळी हा सण सर्वांसाठी आनंदाचा असतो. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा का असेना उत्सवात त्या गोष्टी आड येत नाहीत आणि येण्यासही नकोत. वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींनुसार दिवाळी त्यांना का भावते/आवडते त्याची कारणे वेगवेगळी असतात. त्या सणाचे महात्म्य वेगळे आहे. ते स्थानपरत्वे बदलते का?

कोविड -19 च्या संदर्भाने शरद पवार (Sharad Pawar And Disaster Management)

कोविड-19 च्या प्रभावाने सारी जीवनाची गती मार्च 2020 पासून थांबली आहे. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, प्रशासन आणि त्यामुळे नागरिकांची जगण्याची गती मंदावली आहे. कोविड-19 ही आपत्ती नैसर्गिक वा अनैसर्गिक असे रूढ अर्थाने सांगता येणार नाही.

वावीकर, शिरधनकर यांची पुस्तकांची दुनिया (Books About Books By Wavikar and Shirdhankar)

0
'मी वाचत सुटलो त्याची गोष्ट' (लेखक – निरंजन घाटे) या नावाच्या पुस्तकाचा बोलबाला अलिकडे बराच चालू आहे. त्याच वेळेला, 'अलिकडे लोक वाचत नाहीत' अशा मताचा प्रसार आवर्जून करणारी माणसेही ऐकण्यात येतात. अशा या वातावरणात वाचनावरील जुने पुस्तक हाती यावे हा सुखद योग म्हणावा.

भूम तालुक्यातील बेलेश्वर (Beleshwar Temple Of Bhoom)

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम हा महत्त्वाचा तालुका. भूम हे तालुक्याचे मुख्यालय उस्मानाबादहून बहात्तर किलोमीटर अंतरावर आहे. तेथून ईट हे छोटे गाव अठरा किलोमीटरवर असून, ईटपासून सहा किलोमीटर दूर श्री बेलेश्वराचे देवालय आहे.

शरद पवार आणि महिला धोरण (Sharad Pawar and Womens Policy)

शरद पवार यांचे राजकारण आणि समाजकारण बहुआयामी आहे. त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द ही महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनची आहे. त्यांतील संगती-विसंगती अनेकांना गोंधळात पाडते, तरी त्यांच्या अनेक भूमिका या त्यांच्या संस्थात्मक कामांमुळे लोकांच्या मनात टिकून राहिल्या आहेत. त्यामध्ये महिला धोरण, फळबागांना प्रोत्साहन, लातूर भूकंपनिमित्ताने आपत्ती निवारण व्यवस्था अशा महत्त्वाच्या बाबी येतात.

लोककथांचीच कहाणी! (Story of Folktells)

लोककथा हे कोणत्याही समाजाचे धन असते. समाज जितका पुरातन तितक्या लोककथा अद्भुतरम्य. लोककथा लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्या माणसांनासुद्धा आवडतात आणि ते नैसर्गिक आहे. कारण त्यांनी मनोरंजन तर होतेच व त्याबरोबर बोधही मिळतो.

जातीच्या आधारावर आरक्षण हे देशहिताचेच! (Reservation to Benefit Nation)

चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र असे वर्ग आहेत. शूद्रांचे वर्णन शुद्रातिशूद्र असेही केले जाते. कारण त्यांची दयनीय अवस्था. त्यांच्यावर काम सोपवले ते त्रिवर्णाची सेवा करण्याचे. म्हणून ते  गुलाम, दास, अस्पृश्य, वेशीबाहेरचे अस्पर्श्य ठरले.