हेलेन केलर हे नाव परिचयाचे आहे ते स्नेहभावाचे प्रतीक म्हणून. अंध, मूक-बहिऱ्या असलेल्या त्या मुलीने तिच्या जन्मजात अपूर्णत्वावर मात केली; ती सर्वसामान्य माणसांपेक्षाही अधिक शिकली. पुढे, तिने सर्व जगातील मूक, बधिर आणि अंध यांच्या विकासासाठी कार्य केले. माणसे तिचे आत्मचरित्र वाचतात, प्रभावित-प्रेरित होतात. अधिकतर तिच्यासंबंधी लोकांच्या मनामध्ये अपार आदर असतो.