सांगली कला/वस्तू संग्रहालयात उत्तम चित्रकृती (Sangli Art Museum)
महाराष्ट्रात तेरा शासकीय कला/वस्तू संग्रहालये आहेत. ती शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये विभागाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामध्ये एकट्या कोल्हापुरात दोन संग्रहालये आहेत. बाकी गावे अशी - नागपूर, औरंगाबाद, सिंदखेडराजा, तेर, पैठण, नाशिक, माहूरगड, सातारा, औंध, सांगली, रत्नागिरी. त्याशिवाय खासगी संग्रहालये व संग्राहक यांची संख्या ही वेगळीच आहे. वस्तू संग्रहालयांतील कलावस्तू या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा, सांस्कृतिक बहुविधतेचा आणि कलासंपन्न जीवनशैलीचा वारसा सांगत असतात. त्यामुळे संग्रहालये जपली जाणे- त्यांचे संवर्धन होणे हे महत्त्वाचे होय. त्यासाठी त्यांना लोकाश्रय मिळाला पाहिजे...
शि.द. फडणीस यांचे फ्रेंच कनेक्शन (Cartoonist S D Phadnis’s French Connection)
रेमण्ड सॅविग्नॅक हे प्रसिद्ध फ्रेंच अभिजात उपयोजित चित्रकार होते. सॅविग्नॅक यांनी फ्रेंच ग्राफिक डिझाईन व जाहिरातकला या क्षेत्रात गेल्या शतकारंभी पन्नास वर्षेपर्यंत अतिशय उच्च दर्ज्याचे असे काम केले- नवे पायंडे पाडले. महाराष्ट्राच्या/भारताच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व असे की त्यांना समांतर अशी कामगिरी शि.द. फडणीस यांनी त्यानंतर सुमारे वीस वर्षांनी महाराष्ट्रात केली. त्यामुळे सॅविग्नॅक यांचे काम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी, 2002 मध्ये निधन पावले. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यावेळी एक वेगळाच प्रयोग घडवून आणला गेला. त्यामुळे त्यांचे कार्य विशेषत: पाश्चात्य जगात पुन्हा उजळले गेले...
सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...
छंदमय जीवन जगणारे शिक्षक – शंकर माने
शंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या...
कोरा कॅनव्हास: आकार आणि अर्थ
‘कोऱ्या कॅनव्हास’चे इंगित असे, की त्या निर्विकारी रिकामेपणात एक प्रश्नचिन्ह तरळत असते. त्यामागील प्रश्न असा, की ते रितेपण, ती पोकळी, तो अवकाश काय...
कविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे
प्रभाकर बरवे हे भारतातील श्रेष्ठ चित्रकारांपैकी एक होते. त्यांचे भारतीय आधुनिक कलेतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची कलेवरील निष्ठा व कलेशी बांधिलकी हे गुण संशयातीत...
श्याम लोंढे – ध्यास एकलव्याचा (Shyam Londhe)
श्याम लोंढे हे नाशकात चित्रकार, मूर्तिकार, यशस्वी डिझायनर आणि आर्किटेक्ट म्हणून ओळखले जातात. श्याम यांचा मोलाचा वाटा नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण म्हणून लक्षणीय ठरलेल्या ‘एस्पॅलार’ आणि...
सुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता!
सुहास बहुळकर हा मोठा व्यक्तिचित्रकार (पोर्ट्रेट पेंटर) आहे; त्याने मोठमोठाले कलाप्रकल्प हाती घेऊन ते तडीस नेले आहेत वगैरे ऐकून होतो, पण त्याच्याबद्दल ओढ निर्माण...
चित्रकलेत महाराष्ट्र मागास!
‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे...
चोवीस लाखांतील एक! ईशा चव्हाण (Esha Chavan)
ईशा 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत दुसरी आली तेव्हा मुंबईतील अंधेरीच्या ‘राजहंस विद्यालया’त शिकत होती. त्या स्पर्धेसाठी एकशेदहा देशांतून एकूण चोवीस लाख चित्रे आली...