विचार महत्त्वाचा की नाव आणि हेवेदावे?
उस्मानाबाद येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला आहे. मला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या कामानिमित्ताने वसईच्या फादर कोरिया यांना भेटण्याचा योग आला. कोरिया हे दिब्रिटो यांचे समकालीन, सहकारी. ते जीवनदर्शन केंद्राच्या (वसई) मासिकाचे संपादक आहेत. ते स्वतः लेखक-संशोधक आहेत. त्यांच्या भेटीमुळे मला त्या वादासंबंधातील एक चर्चाही ऐकण्यास मिळाली. त्यामुळे माझा योगायोगाने त्या वादाशी संबंध आला आणि मला त्यावर हसावे की रडावे हे कळेना...
दलित ही आहे विद्रोही सांस्कृतिक संज्ञा
न्यायालयांची भूमिका ‘दलित’ या शब्दाऐवजी ‘अनुसूचित जाती’ असा उल्लेख शासकीय कागदपत्रांमध्ये करावा अशी आहे. ती प्रशासन चालवण्याच्या दृष्टीने समजण्यासारखी आहे. न्यायालयाने म्हटले आहे, की ‘दलित’ या शब्दातून ‘शोषित’, ‘पीडित’, ‘दडपलेले’ असे अर्थ व्यक्त होतात, त्यामुळे तो शब्द अपमानजनक आहे, समूहाच्या दुर्बलतेकडे, दुय्यमत्वाकडे इशारा करणारा आहे. न्यायालयाचे प्रतिपादन वर वर पाहता रास्त वाटते; पण केंद्र व राज्य सरकारे जेव्हा केवळ शासकीय व्यवहारातून नव्हे तर, एकूणच, समाजाच्या सार्वजनिक पटलावरून ‘दलित’ हा शब्द गायब करण्याचे धोरण अहमहमिकेने राबवू पाहताना दिसतात...
केकावली (Kekavali)
‘केकावली’ ही मोरोपंताची रचना प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. मोरोपंत हे पंडित कवी. त्यांनी ‘श्लोक केकावली’ लिहिण्यापूर्वी ‘आर्या केकावली’ नावाची रचना केली होती. त्यातील आर्या...
अमृतानुभव (Amrutanubhav)
ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या निर्मितीनंतर वेदांतावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याच्या उद्देशाने अमृतानुभावाची निर्मिती झाली. त्या ग्रंथात दहा प्रकरणे असून आठशेचार ओव्या आहेत. ज्ञानेश्वरांनी त्यांचा आवडता...
महिकावतीची बखर (Mahikavati Bakhar)
महिकावतीची बखर हे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९२४ साली तर दुसरी आवृत्ती १९९१ साली प्रकाशित झाली. राजवाडे...
भाषांतर मासिक (Bhashantar Masik)
राजवाडे यांनी ‘भाषांतर’ मासिकाचा पहिला अंक जानेवारी १८९४ मध्ये प्रसिद्ध केला. राष्ट्राचा स्वाभिमान वाढीस लावण्यासाठी व जगातील निरनिराळे विचारप्रवाह देशबांधवांना सांगण्याच्या हेतूने उत्तमोत्तम, विचारप्रवर्तक...
व्हीकेराजवाडे.कॉम (vkrajwade.com)
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी जमवलेल्या सुमारे एक लाख दुर्मीळ कागदपत्रांचा ठेवा http://vkrajwade.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला गेला आहे. राजवाडे संशोधनमंडळ (धुळे), यशवंतराव...
अक्षता
अक्षता हा शब्द सर्वांच्या अगदी चांगला परिचयाचा! लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर त्यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी...
बब्रूवान रुद्रकंठावार (Babruvan Rudrakanthawar)
बब्रूवान रुद्रकंठावार यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर. त्यांचे नाव मराठी साहित्यात गाजले; त्याचे कारण म्हणजे त्यांच्या लिखाणातील अस्सल मराठवाडी ग्रामीण भाषा. त्यांचे चिंचोली -...
मराठवाडी बोली सिन्थेसाईज्ड वुईथ इंग्लिश… डेडली कॉकटेल!
अरुण साधू कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे वैचारिक राजकीय व सामाजिक लेखनही बरेच आहे. साधू स्वत: उत्तम वाचक, आस्वादक आणि संपादक होते. त्यामुळे त्यांची...