समस्या मतिमंदांची नव्हे; त्यांच्या पालकांची!

'अपंग' ही संज्ञा अंध, मूकबधिर, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी सर्वांसाठी वापरली जाते, पण मतिमंदत्व व अन्य प्रकारचे अपंगत्व यांत खूप फरक आहे. अन्य प्रकारच्या अपंगत्वात अपंग व्यक्तीस आपल्या अपंगत्वाची जाणीव असते. त्यावर मात करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा तिचा प्रयत्न असू शकतो. ते शिक्षण, प्रशिक्षण, अन्य व्यक्ती व संस्था यांची मदत मिळवून अंशत: तरी स्वावलंबी होऊ शकतात. मतिमंदांच्या बाबतीत तसे होत नाही. त्यांना आपल्यात काही उणीव आहे याची जाणीव-बोध नसतो. मतिमंदत्व जर तीव्र असेल तर भोजन, स्वच्छता, संरक्षण या गोष्टीही पालकांनाच कराव्या लागतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतिमंदत्वाचे प्रमाण कितीही असले तरी अशा व्यक्तींची काळजी कायम दुस-यांना घ्यावी लागते...

महाराष्ट्र टिकला पाहिजे

0
महाराष्ट्र टिकला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे असे मला मन:पूर्वक वाटते. ते भाषा आणि विकास या दोन पायांवर  शक्य होईल असा मला विश्वास आहे. त्यासाठी भाषा, समाज आणि संस्कृती या तीन घटकांचा नव्या संदर्भात विचार केला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र समितीला ती संधी होती, पण राजकीय दुफळीमुळे त्यांना ते जमले नाही. शिवसेनेचे एकूण महाराष्ट्राबद्दलचे आणि भाषिक राजकारणाबद्दलचे आकलन मर्यादित असल्याने त्यांनी या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याचा गांभीर्याने विचारच केला नाही. मनसे याबाबत सुरुवातीला आश्वासक वाटली होती. पण राज ठाकरेंचे विदर्भात सार्वमत घ्यावे असे एखादे विधान सोडले तर तो पक्ष (किमान प्रकटपणे) सक्रियपणे विदर्भाचा विचार करतो असे दिसत नाही. प्रतीकात्मक राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन अधिक समग्रपणे महाराष्ट्राचा विचार करायचा तर राज्यांतर्गत सत्तावाटपाचा आणि केंद्र-राज्य संबंधांचाही पुनर्विचार करावा लागेल. अशा अस्मितेला अस्पृश्य न मानणार्‍या ज्ञानाधिष्ठित चळवळीची  महाराष्ट्राला गरज आहे. मी त्याला ‘मराठीकारण’ (मराठीकरण नव्हे) म्हणतो. असे मराठीकारण उभे राहणे आणि पुरोगाम्यांनीही त्यापासून  ‘पल्ला न झाडणे’ ही या विचारमंथनाची योग्य निष्पत्ती ठरेल...

मराठी अस्मिता !

मराठी अस्मिता आज महोत्सव साजरे करण्यात गुंतली आहे... तर अशा परिस्थितीत ‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ या सेनापती बापटांच्या उक्तीचे काय होणार? – सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राला...

जात म्हणे जात नाही!

मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला किंवा कोणालाही शक्य नाही. जात नाहीशी करुया असे म्हणणे, आमच्या मते, शुद्ध वेडेपणाचे आहे. इतिहास पुसला जात नसतो. एक वेळ, तो इतिहासाच्या पुस्तकांमधून काढून टाकता येईल, संगणकाच्या मेमरीमधून ‘डिलीट’ करता येईल. पण तो जित्याजागत्या माणसांच्या मेमरीमधून नाहीसा कसा करणार? विशेषत: त्या पाठीमागे जेव्हा अनेक पिढ्यांच्या भावना दडलेल्या असतात, परंपरा दडलेल्या असतात, पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्कृती दडलेली असते, ते डिलीट कसे होणार? आणि तशी जरूरी पण नाही...

बाप रखुमादेवीवरू

बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं...

आधुनिकतेचा ध्यास हवा! (Modernity Needs Attention!)

0
जलसिंचन दिन : 26 फेब्रुवारी... (Irrigation Day: February 26th) पिकाला पाणी फार कमी लागते, हे जर पटले तर उत्पादनवाढीच्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. पिकाच्या पूर्ण...

अकोला करार – 1 प्रगट, 2 गुप्त ! (Akola pact – 1 Revealed, 2...

1
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील सोळा नेत्यांनी 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोल्यात वाटाघाटी करुन एका करारावर सह्या केल्या. तोच हा अकोला करार. शंकरराव देव, शेषराव...