विधानपरिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तो कोरोनाच्या अनिश्चिततेमुळे सध्या स्थगित झाल्यासारखा वाटतो, परंतु विधीमंडळाचे अधिवेशन भरवण्याची वेळ आली, की प्रश्न राजकारणात उग्र रूप घेईल. दहा सदस्यांचा कार्यकाळ 6 जून रोजी संपुष्टात आलेला आहे.
‘फिल्म सोसायटी’ ही संकल्पना मराठी रसिकांना 1968साली पूर्णत: नवी होती. आम्ही ‘प्रभात चित्र मंडळ’ स्थापण्याचा बेत आखला, पण आम्हाला तरी त्यामागील मूळ विचार कोठे स्पष्ट होता? तो जसजसा उलगडत गेला तेव्हा लाभलेली जाणीवसमृद्धी हा मात्र आयुष्यभराचा ठेवा झाला आहे...
समाजात वेगळे वेड घेऊन जगणारी माणसे असतात. तशा चौतीस व्यक्तींचा परिचय 30 एप्रिलपर्यंत 'लॉकडाऊनच्या काळातील धावत्या नोंदी' या शीर्षकाखाली करून दिल्या. त्यांतील काही व्यक्तींच्या कामांना, विचारांना विशेष दाद मिळाली. नोंदी 1 मे पासून थांबवल्या होत्या, तो एकूण परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी...
कोरोनाच्या बरोबरीने जगभर फैलावलेली आपत्ती म्हणजे घरगुती हिंसाचार (डोमेस्टिक व्हॉयलन्स). तो विषय देशोदेशी चिंतेचा बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्याबाबत सावधान असण्याची गरज व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये बायकोला छळणाऱ्या नवऱ्यालाच क्वारंटाईन करण्याची सजा फर्मावली गेली आहे.
कोरोना चीनमध्ये उद्भवला, जगभर पसरला, आता स्थिरावला. म्हणजे त्यामुळे देशोदेशांची जी अवस्था झालेली आहे, ती अटळ आहे; त्या देशांचा विचार व कारवाई ती अवस्था कशी सांभाळायची, अधिक बिघडू द्यायची नाही हे सर्व देशांनी स्वीकारले आहे.
कोरोना साथीचा आरंभ चीनमध्ये झाला. तो कसा झाला? केव्हा जाहीर झाला? याबद्दल विवाद आहेत. खरे तर, तो सोशल मीडियावरून भारतात कळला. भारतानेच नव्हे, तर साऱ्या जगाने तो चीनचा स्थानिक प्रश्न म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले.
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांचा 'करोना' संबंधीचा लेख रविवारच्या 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो तुम्ही सोबतच्या लिंकवरून वाचू शकता.
भारतीय संसदेने महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीदिनापासून म्हणजे 2 ऑक्टोबर 2019 पासून भारतात प्लास्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ती गोष्ट...
पाण्याच्या खाजगीकरणाचा पुरस्कार भारताच्या राष्ट्रीय जलनीतीमध्ये करण्यात आला आहे. खाजगीकरणाचा प्रयोग दिल्लीसारख्या राज्यात करण्यातही आला आहे. पाण्याची मुक्त बाजारपेठ पाण्याचे दर ठरवील; भाव वाढले,...
देशाचा कायदा, न्याय ह्याला न जुमानता कायदा हातात घेतला जातो; लोक गर्दी करतात आणि त्यांच्या विचारांच्या विरूद्ध वागत असलेल्या माणसाला मारहाण करतात किंवा जिवे...